आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने वाठोड्याच्या देवांशी वागद्रेला जीवदान !

0
752
Google search engine
Google search engine
आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने वाठोड्याच्या देवांशी वागद्रेला जीवदान !
तातडीने मुंबई येथे शस्त्रक्रिया करून दीड वर्षाच्या चिमुकलीचे जीवन केले सुकर !
आमदार देवेंद्र भुयार ठरत आहे रुग्णांसाठी देवदूत !
वरुड प्रतिनिधी:
मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार वरुड मोर्शी तालुक्यातील रुग्णांचा ईलाज करण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णसेवा देण्यासाठी नेहमी तत्पर असतात, आमदार देवेंद्र भुयार यांनी ज्या गरिबांजवळ असाध्य रोगांवर उपचार करवून घेण्यासाठी पैसा नाही, ज्यांना मरणाशिवाय पर्याय नाही अशा रुग्णांना मदत करत आहे. त्यांनी आदिवासी व ग्रामीण भागांत राहणार्‍या गरीब व कोणीही वाली नसलेल्या रुग्णांना स्वास्थ्य सुविधा पुरवविण्याचे काम करीत आहे.
           जन्मतःच हृदयाला छिद्र व श्वसन नलिकेवर मांस आल्याने दीड वर्षाच्या देवांशी वागद्रेला श्वास घ्यायला त्रास व्हायचा. वय कमी असल्याकारणाने देवांशीची शस्त्रक्रिया शक्य नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान देवांशि वागद्रे जशी जशी मोठी होत होती तसा तिला श्वास घायला त्रास व्हायचा, चालतांना व  खेळतांना सुद्धा दम भरून यायचा. आपल्या चिमुकलीला होणाऱ्या त्रासामुळे वागद्रे कुटुंब चिंतेत होते. देवांशीचे वडील शिवाजीराव वागद्रे यांनी पंचायत समितीचे माजी सभापती निलेश मगर्दे यांना भेटून सर्व माहिती दिली. माजी सभापती निलेश मगर्दे यांनी आमदार भुयार यांना देवांशीच्या शस्त्रक्रिये बाबत माहिती दिली असता आमदार देवेंद्र भुयार यांनी पुढाकार घेऊन क्षणाचाही विलंब न करता देवांशी वागद्रेला मुंबई येथे नेऊन एस.आर. सि. सी. हॉस्पिटलमध्ये मोफत ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. रुग्णसेवा करून वरुड मोर्शी तालुक्यातील शेकडो रुग्णांसाठी आमदार देवेंद्र भुयार देवदूत ठरत आहे.
    तालुक्यातील वाठोडा येथिल वागद्रे कुटुंबातील दीड वर्षाच्या देवांशी या चिमुकलीच्या हृदयात छिद्र व श्वसन नलिकेवर मांस आल्याचे निदान  झाल्यानन्तर शस्त्रक्रिये करीता 6 ते 8 लक्ष रुपये खर्च येणार असल्याचे कळताच साधारण परिस्थिती असलेल्या वागद्रे कुटुंबावर आभाळच कोसळले. देवांशीच्या आरोग्याची काळजी असलेल्या वागद्रे कुटुंबियांनी माजी सभापती नीलेश मगर्दे यांना मदत मागितली असता त्यांनी मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर आमदार देवेंद्र भुयार यांनी क्षणाचाही विलंब न करता देवांशीच्या शस्त्रक्रिया करण्याकरिता देवांशिला तात्काळ मुंबई येथे ओपन हार्ट सर्जरी करिता ऍडमिट करून शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.
           शस्त्रक्रियेनन्तर देवांशीची प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे. आमदार देवेंद्र भुयार व माजी सभापती निलेश मगर्दे यांच्या पुढाकाराने गरीब कुटुंबातील चिमुकलीचे जीवन सुकर झाल्याने वागद्रे कुटुंबियांनी आमदार देवेंद्र भुयार , माजी सभापती निलेश मगर्दे यांचे आभार व्यक्त केले.