आमदार देवेंद्र भुयार यांचा ग्राम पंचायतींना टँकर वाटपाचा नाविन्यपूर्ण उपक्रम ! मोर्शी तालुक्यातील ७ ग्राम पंचायतींना पाण्याचे टँकर उपलब्ध  !

0
1304
आमदार देवेंद्र भुयार यांचा ग्राम पंचायतींना टँकर वाटपाचा नाविन्यपूर्ण उपक्रम !
स्थानिक विकास निधी अंतर्गत उपलब्ध करून दिले पाण्याचे टँकर !
मोर्शी तालुक्यातील ७ ग्राम पंचायतींना पाण्याचे टँकर उपलब्ध  !
मोर्शी (तालुका प्रतिनिधी)
    मोर्शी तालुक्यातील विविध गावांना उन्हाळ्याच्या दिवसात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. आजही तालुक्यातील ग्रामस्थांना शाळकरी विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागत आहे. वयोवृद्ध नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. कित्येक गावातील नागरिकांना शंभर ते दोनशे रुपये ड्रम पाणी विकत घ्यावे लागते. पिण्याच्या पाण्याची कॅन विकत घ्यावी लागत आहे. यापूर्वी अनेक गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतीवर पाण्यासाठी घागर मोर्चा नेऊन आंदोलने सुद्धा उभारली.
मात्र या गंभीर समस्येची दखल घेतल्या जात नव्हती. परंतु मोर्शी तालुक्यात भीषण पाणी टंचाई लक्षात घेऊन नागरिकांना पाण्याची उपलब्धता व्हावी, यासाठी पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरने सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी मोर्शी येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत मोर्शी तालुक्यातील हिवरखेड, रिद्धपुर, अंबाडा, पिंपळखुटा (मोठा), आष्टोली, धानोरा ,तरोडा, या  गावांना आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते पिण्याच्या पाण्याचे टँकर वाटप करण्यात आले. या पिण्याच्या पाण्याच्या टँकर मधून ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना पाणी देण्यात येणार आहे. तथापि गावखेड्यात लग्न सोहळ्यासह विविध कार्यक्रमांना सुद्धा या टॅंकरद्वारे पाणी पुरविल्या जाणार आहे.
इतिहासात पहिल्यांदाच आमदार देवेंद्र भुयार यांनी भीषण पाण्याची टंचाई लक्षात घेऊन ग्रामस्थांना पाणी पुरविण्याचे काम हाती घेतल्याने त्यांचे सर्व ग्रामपंचायत तर्फे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बंडुभाऊ साउत, माजी न.प. उपाध्यक्ष मोहन मडघे, नगरसेवक डॉ प्रदीप कुऱ्हाडे, पिंटू महल्ले, स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष हितेश साबळे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहरप्रमुख अंकुश घारड, विलास ठाकरे , घनश्याम कळंबे, हिवरखेड येथील सरपंच विजय पाचारे, रिद्धपुर येथील सरपंच गोपाल जामठे,  आष्टोली येथील सरपंच नंदकिशोर कोहळे, धानोरा येथील सरपंच दिनेश जवंजाळ, अंबाडा येथील सरपंच अमोल कडू, तरोडा येथील सरपंच उषा अढाऊ, पिंपळखुटा येथील सरपंच शुभांगी मोगरकर यांच्यासह उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य आदी मंडळी यावेळी उपस्थित होती.