सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील रामकृष्ण संजय गायकवाड यांचे Gate 2021 परीक्षेत यश.भारतात ४६ वा क्रमांक.                    

            
सांगली/ कडेगांव न्युज

             

 सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील प्रगतीशील शेतकरी संजय गायकवाड यांचे सुपुत्र रामकृष्ण गायकवाड यांचे इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये राष्ट्रीय पातळीवर मिळवले यश! 

 कडेगाव येथील मराठा समाजातून सामान्य परिस्थितीत शिक्षण घेणारे रामकृष्ण संजय  गायकवाड यांनी पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व इन्सट्रुमेंटेशन पदवी अभ्यासक्रम पूर्ण करताना यातील पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असणारी गेट २०२१  ही परीक्षा यावर्षी सातारा केंद्रातून दिली.या परीक्षेत त्यांनी संपूर्ण  अखिल भारतीय स्तरावर 46 वा क्रमांक मिळवला आहे.. कडेगाव सारख्या ग्रामीण भागातून त्यांनी मिळवलेले हे यश अतिशय उत्तुंग असून यानंतर देशातील नामांकित आयआयटी संशोधन केंद्रातून या अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण घेण्याचे व देशाची सेवा करण्याचे त्यांचे स्वप्न साकार होणार.त्यांच्यावर  या यशासाठी कडेगाव तालुका  व परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.भाजपा जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख, जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, धनंजय देशमुख,विजय गायकवाड, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष डांगे,दिपक कुलकर्णी, नामदेव देशपांडे, दिपक शेडगे,तालुक्यातील पत्रकार यांनी अभिनंदन केले.