जिल्ह्यात अत्यावश्यक कामासाठी तुम्हाला पास  काढायचा आहे ?

0
1159
Google search engine
Google search engine

जिल्ह्यात अत्यावश्यक कामासाठी तुम्हाला पास  काढायचा आहे ?

सविस्तर बातमी

नितीन ढाकणे, दिपक गित्ते 

बीड जिल्ह्यातील वाढलेल्या कोरोना संक्रमणाच्या अनुषंगाने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) नुसार बीड जिल्ह्यात मनाई आदेश (लोकडाऊन) दि.25 03 2021 च्या मध्यरात्रीपासून दि.04.04. 2021 चे मध्यरात्री 12.00 या कालावधी करिता लागू करण्याल आला आहे.

सदर कालावधीत कोरोना संक्रमित रुग्णांसाठी व इतर रुग्णांसाठी जेवण, नाष्टा, चहा व इतर पुरवठा करण्यासाठी पूर्वपरवानगीने सवलत देण्यात आलेली आहे. तसेच सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने बंद ठेवण्यात आलेले आहेत. तथापि अत्यावश्यक सेवेतील वाहने, पूर्वपरवानगी वाहने व वैदयकीय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनांचा वापर अनुज्ञेय करण्यात आला आहे. परंतु त्यासाठी ओळखपत्र / पूर्वपरवानगी अथवा वैद्यकीय पुरावा असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

तसेच दहावी व बारावी आणि विद्यापीठाच्या परीक्षांच्या कामकाजा करिता अत्यावश्यक मनुष्यबळाला परवानगी देण्यात आली आहे. तसेच अनेक महाविदयालय प्रवेश प्रक्रीया सुरू आहे. सबब ज्या विदयाध्याकडे प्रात्यक्षिक परिक्षा / दहावी व बारावी/ विदयापिठीय परिक्षेचे प्रवेशपत्र ( हॉलतिकीट) व ओळखपत्र आहे त्याआधारावर संबंधित ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी वेगळया परवान्याची आवश्यकता नाही.

शेतीच्या मशागतीसाठी मुभा आहे सबब शेतीच्या मशागतीसाठी घरापासुन शेतापर्यंत ट्रॅक्टरचा वापर करण्यास वेगळया परवान्याची आवश्यकता नाही. तथापी मशागतीच्या नावाखाली इतर कारणास्तव ट्रक्टरचा वापर दंडास पात्र राहील.

बाहेरच्या जिल्हयातून जिल्हयात येणा-या व्यक्तीने अॅन्टीजन / आरटीपीसीआर ( प्रवेशापुर्वी 8 दिवस ) तपासणी केलेले असणे बंधनकारक असेल अशा कोणत्याही व्यक्तीस अॅन्टीजन ।

आरटीपीसीआर तपासणी न करता प्रवेश अनुज्ञेय राहणार नाही. बीड जिल्हयाच्या बाहेरील नागरिकांना
इतर जिल्हयात जाताना बीड जिल्हयाच्या हददीतून न थांबला जाण्यासाठी प्रवेश अनुज्ञेय राहील.
त्याकरिता वेगळया परवान्याची आवश्यकता नाही.

त्या अनुषंगाने प्रत्येक तहसील कार्यालयाच्या पातळीवरती परवाने देण्याकरता स्वतंत्र कक्ष निर्मिती करण्यात आली आहे.

प्रत्येक तहसील कार्यालया करिता एक स्वतंत्र ईमेल आयडी निर्माण करण्यात आला असून त्या ठिकाणी त्या कक्षामध्ये दोन कर्मचान्यांचे व्हॉट्सअॅप क्रमांक जनतेला उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

ज्या नागरिकांना कोणत्याही अती तातडीच्या कारणास्तव परवान्याची आवश्यकता असेल अशा नागरिकांनी या तहसील कार्यालयाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर अथवा इमेल वरती विहित नमुन्यात मधील अर्ज आणि त्याबरोबर अत्यावश्यक कागदपत्रे जोडून आपला अर्ज सादर करावा त्यांना त्याच दिवशी विहित नमुन्यामध्ये संबंधित सक्षम अधिकारी यांचेकडून परवानगी देण्यात येईल.

नागरिकांची अडचणीच्या काळात गैरसोय होऊ नये याकरिता व्हाट्सअप आणि इमेल वरती परवानगी देण्याची सोय प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. ज्या तहसील कार्यालयाच्या पातळीवरती परवानगी मिळण्यास अथवा संपर्क साधण्यास नागरिकांना अडचण होत असेल अशा नागरिकांकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली असून त्या ठिकाणी अशा प्रकारचे अर्ज स्वीकारण्यासाठी व त्यावर कार्यवाही करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पातळीवर स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आलेला आहे.