शेगाव शहरात आठवडी बाजार बंद बाकी सर्व सुरू शेतकऱ्यांवर अन्याय वारे शासन..?

0
755

शेगाव शहरात आठवडी बाजार बंद बाकी सर्व सुरू शेतकऱ्यांवर अन्याय वारे शासन..?

शेगाव:-
मागील काही महिन्यात बुलढाणा जिल्ह्यात व ईतर तालुक्यात कोरोनाने थैमान घातला असता
संतनगरी शेगाव मध्ये बर्‍यापैकी रुग्ण आढळून आले या अनुषंगाने शासनाने निर्बंध लावले परंतु हे निर्बंध मंगळवारीच आठवडी बाजाराच्या दिवशिच जास्त प्रमाणात दिसून येते शहरात बाजाराच्या दिवशी शेतकरी आपला माल बाजारात विकायला आणतो शासन ते जप्त करते म्हणजे शेतकऱ्यावर अन्याय आठवड्यातून एक दिवस शेतकरी आपल्या शेतातील मल विकायला आणतो आपला उदरनिर्वाह करतो.
काही दिवस अगोदर शेगाव येथील टाउन हॉल मध्ये व्यापारी लोकांची कोरोणा चाचणी करण्यात आली त्यांना दुकाने चालू ठेवण्याची मुभा देण्यात आली असेच काही धोरण दाखवून व नियमांचे काटेकोर पालन करून बाजारांना का मुभा दिली जात नाही
असा भेदभाव का
शेगाव शहरात ज्याप्रमाणे कोरोना ने आपले जोर वाढवला आहे त्यापेक्षा अधिक अवैध धंद्या चा जोर अधिक वाढलेला गावात दिसून येत आहे परंतु यावर कुठलीच कारवाई होत नाही का येथे कोरोना येत नाही हे तर आठवडाभर चालवतात व नियमांचे पालन सुद्धा केल्या जात नाही.
शेगाव शहरात कोरोना वाढण्याचे कारण विनामास्क लावुन फिरणारी रिकामी जनता सोबत शासन व प्रशासन तसेच येथील जनप्रतिनिधी सुध्दा आहेत त्याचे कारण शासनाचा हलगरजी पणा मागील काळात यावर दुर्लक्ष करून नियमांची काटेकोर अम्मलबजावनी केली असती तर आज चित्र वेगळे असते पण प्रशासनाने काहींना सूट द्यायची व काहींना सोडून द्यायचे आज त्यामुळे कोरोणाचा प्रादुर्भाव वाढत असताना दिसते त्यावर विशेषतः नगरपरिषद मध्ये लावण्यात आलेले सेनिटायझर ची मशीन बंद आहे आणि कुठल्याच प्रकारची व्यवस्था नाही जनता बेधडक नगर परिषदेत येतात व आपली कामे करून जातात याला जबाबदार कोण?
आठवडी बाजाराच्या दिवशी बसलेल्या प्रत्येक दुकानदाराकडून पावती घेतले जाते की आपण इथे व्यवसाय करत आहे मेंटेनन्स करण्यासाठी ही पावती आहे परंतु आज आपण बाजार नभरता त्या ठिकाणी भरपूर अशी घान कचरा पाहु शकता सोबतच कुठल्याच प्रभागात कधी कीटकनाशक फवारणी केली जाते याची कुठलीही नोद नाही
पाच वाजता मार्केट बंद पण शहरातील गेस्ट हाऊस रात भर उघडे का ईथे कोरोना येत नाही फक्त तेच येतात (समजुन घ्या ) शेवटी ऐकच नगरपालिका, पोलिस प्रशासन, तहसिल दार यांना लोकांच काहीच घेन देन नाही ‘जगसाल जगा मरसाल मरा’ पण मास्क न लावणाऱ्यांवर आम्ही कार्यवाही करणार नाही कारण क्रांतिविर चित्रपटाचा नाना पाटेकरचा डायलॉग आठवाना हो तो किडे मकोडे वाला
म्हणुन म्हणतो
वरे शासन…!