अकोला शहरातील ऑटोस्टॅण्ड चा गंभीर प्रश्न लवकरच सुटणार। ऑटो साठी 20 थांब्याना मंजुरी

0
1239
Google search engine
Google search engine

अकोलाःप्रतिनिधी

पश्चिम विदर्भातील सर्वात जास्त ऑटो असणारे शहर म्हणून अकोला प्रसिध्द आहे, नेमकी हीच ओळख अकोल्या साठी डोकेदुखी ठरत आहे, लोकसंख्या व गरजेच्या कितीतरी जास्त प्रमाणात ऑटो अकोला शहरात धावतात, बेरोजगारी हे एक प्रमुख कारण असले तरी इतरही अनेक कारणे ह्या मागे आहेत, आज अकोला शहरात 6500 ते 7000 ऑटो धावतात,परंतु एवढ्या मोठ्या संख्येने धावत असलेल्या ऑटो साठी ज्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक होत्या त्या दुर्दवाने अजूनही नाहीत, अशोक वाटिका चौक ते रेल्वे स्टेशन ह्याच मार्गावर ह्या एकूण ऑटो पैकी 60 टक्के ऑटो धावतात व नेमके ह्याच मार्गावर मागील दीड वर्षा पासून उड्डाण पुलाची निर्मिती सुरू आहे, चांगले प्रशस्त रोड व सर्व सुविधा युक्त ऑटो स्टँड ह्याची गरज वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असते परंतु नेमकी हीच सुविधा अकोल्यात नसल्याने वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे,

अकोला महानगरपालिका अस्तित्वात येऊन आज 20 वर्षा पेक्षा जास्त कालावधी झाला आहे, परंतु अकोला शहरात अजूनही एवढ्या प्रचंड संख्येने धावणाऱ्या ऑटो साठी एकही अधिकृत ऑटो स्टँड नाही, प्रशस्त रोड नाही, अधिकृत ऑटो स्टँडच नसल्याने व सध्या पोस्ट ऑफिस चौक ते टॉवर चौक दरम्यान उड्डाणपुलावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू असल्याने रोडवर दोन्ही बाजूला बॅरिकेटिंग करण्यात आले आहे, त्या मुळे वाहतुकीसाठी खूप कमी रोड बाकी राहिला आहे, त्यातच बसस्टँड चे आजूबाजूला शहराचे चारही बाजूला प्रवाश्यांना घेऊन जाणारे ऑटो उभे ठेवावे लागतात, त्यांचे साठी अधिकृत कोणतेही ऑटो स्टँड नसल्याने ते कुठेही उभे राहतात, रोड छोटा झाल्याने वाहतुकीचे नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसांना ह्या ऑटो वाल्यांचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो,

परंतु अधिकृत ऑटो स्टँड किंवा उड्डाणपुला मुळे अत्यल्प जागा राहिल्याने आज धिंग्रा चौकात वाहतूक सुरळीत ठेवतांना वाहतूक पोलिसांना सतत हजर राहून प्रचंड मेहनत घ्यावी लागते परंतु वाहतुकीचा खोळंबा झाला की सर्वसामान्य नागरिकांचा रोष सुद्धा वाहतूक पोलिसांनाच सहन करावा लागतो, ही बाब हेरून शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी जिल्हा रस्ता सुरक्षा समिती मीटिंग मध्ये ऑटो स्टँड चा गंभीर मुद्दा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे पुढे ठेवला असता त्यांनी एक समिती स्थापन करून ऑटोस्टॅण्ड साठी संपूर्ण शहरात जागा निश्चित करण्याच्या सूचना दिल्या त्या अनुषणगाने आर.टी .ओ., महानगरपालिका, शहर वाहतूक शाखा चे अधिकाऱ्यांनी शहरात सर्वेक्षण करून शहराचे चारही बाजूला प्रमुख चौकात एकूण 20 जागा निश्चित केल्यानंतर पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे मार्फत 9 महिन्या पूर्वी मनपा आयुक्त ह्यांचे कडे प्रस्ताव पाठविल्या नंतर त्यावर विचार सुरू असतानाच नव्याने रुजू झालेल्या मनपा आयुक्त निमा अरोरा ह्यांनी गंभीरता लक्षात घेऊन 2 दिवसा पूर्वी सदर प्रस्तावाला मंजुरी दिली यामुळे

लवकरच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देऊन सदरच्या जागा ऑटो स्टँड साठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, टॉवर चौक ते पोस्ट ऑफिस चौका पर्यंतची उड्डाणपुला खालील संपूर्ण जागा ही ऑटो स्टँड साठी उपलब्ध करून देण्यात आली असून, उड्डाणपुलाचे बांधकाम संपल्या बरोबर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊन तेथे सुद्धा लवकरच ऑटोस्टॅण्ड झालेले दिसतील, एकूण एका महिन्यात अकोला शहरातील प्रचंड संख्येने धावणाऱ्या ऑटोना एकदाची थांबण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे, ह्या मुळे वाहतुकीची समस्या लवकरच सुटेल अशी आशा धरण्यास हरकत नसावी।