डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची पंचशील नगर कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी सतीश डुमणे तर उपाध्यक्षपदी प्रवीण घाडगे

0
540

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची पंचशील नगर कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी सतीश डुमणे तर उपाध्यक्षपदी प्रवीण घाडगे

परळी/प्रतिनिधी
भारतरत्न महामानव परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या130व्या जयंती निमित्त परळी येथील पंचशील नगरची कार्यकारणीची बैठक संपन्न झाली त्यात सर्वानुमते जयंती च्या अध्यक्षपदी सतीश डुमणे तर उपाध्यक्षपदी प्रवीण घाडगे यांची निवड करण्यात आली.

पंचशील नगर येथील बौद्ध विहारात दि 23/03/2021 रोजी बाबासाहेब सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारच्या कोरोना विषयीच्या सर्व नियमावली चे पालन करून जयंती साजरी करण्यात येणार आहे. जयंतीची उर्वरित कार्यकारणी पुढील प्रमाणे कोषाध्यक्षपदी विजय सरवदे, संरक्षण प्रमुख पदी शैलेश आचार्य कार्याध्यक्षपदी अक्षय ढगे यांची निवड करण्यात आली.

यावेळी छगन गोदाम, मिलिंद घाटे ,पंढरी ढगे ,रवींद्र सरवदे, आर के सरवदे ,निलेश मुंडे ,राम ढेंगळे,उबाळे ताई, पार्वतीताई वाघमारे ,प्रभावती ताई जगताप, सुदामती बाई सावंत ,गवळण बाई वाघमारे ,गोविंद कांबळे ,अमित आचार्य ,श्रावण वाघमारे ,अण्णा सरवदे ,राजेश पोटभरे ,आकाश जोगदंड , किरण जगताप आदीसह युवक महिला नागरिक उपस्थित होते