अभ्यासासाठी वेळ मागतोय, जुगारखेळण्यासाठी नव्हे!

0
827
Google search engine
Google search engine
अभ्यासीकेचा २ तास वेळ वाढवून द्या – विद्यार्थ्यांची मागणी
शेगांव:- शहरात अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी एम.पी.एस.सी.ची अर्थातच राज्यसेवा, पोलिस उपनिरीक्षक अधिकारी, कर सहाय्यक अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारी, पोलीस भरती, बैकींग, यु.पी.एस.सी. ची तयारी करण्याकरीता अहोरात्र मेहनत करतात, त्यातील अनेक विद्यार्थी घरी अभ्यास नीट होत नाही म्हणून अभ्यासिका लावतात, अभ्यासिकेची भली मोठी फी परवडत नाही तरी आपला अभ्यास व्हावा यासाठी फी देखील देतात तर एकीकडे फी आकारणारे अभ्यासिकेचे प्रशासन त्या विद्यार्थ्यांना प्राथमिक सोई सुविधांपासून वंचित ठेवते आहे असे निदर्शनास येते.
शहरातील नगरपरिषद हद्दीत असलेले जगतगुरू संत तुकाराम महाराज अभ्यासीकेचा अतिरिक्त २ तास वाढवून द्या अशी मागणी तेथे एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नगरपरिषद मुख्याधिकार्यांकडे एका अर्जाव्दारे केली आहे.
११ एप्रिल रोजी होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षांचा विचार करता अभ्यासिकेचा वेळ तिच्या असणाऱ्या वेळे अतिरिक्त २ तास वाढवून द्या ही मागणी महिन्याभरापासून अभ्यासिकेतील विद्यार्थी करीत होते, त्यासाठी तेथील विद्यार्थी अभ्यासिका संबंधित अधिकारी यांना सुध्दा भेटले, त्यांना वेळ वाढून द्या ची मागणी मौखिक स्वरूपात, ऑनलाईन व्हॉट्स ॲप व्दारे विनंती केली, पण त्याचा फायदा विद्यार्थ्यांना झाला नाही नंतर विद्यार्थी थेट नगरपरिषद मुख्याधिकारी यांना भेटले त्यांना अर्ज दिला तर त्यावेळी ते सकारात्मक होते पण वेळ वाढवून मिळाला तो ही १ चं तास!
मागणी होती २ तासांची ते ही अगदी एमपीएससीच्या पेपरच्या दिवसापर्यंत पण नगरपरिषदेतील भावना शून्य उपमुख्यधिकारी यांनी कोरोनाचे कारण सांगत विषय संपविला यावर विद्यार्थ्यांची नाराजगी दिसून आली. लॉकडाऊनमध्ये शहरात अनेक अभ्यासिका १४-१५ तास सुरू आहेत. त्यात नगरपरिषदेची स्वतःची डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय ही सुद्धा सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत सुरू असते. मग कोरोनाचे संकट संत तुकाराम महाराज अभ्यासिकेलाच आहे का? अभ्यासासाठी वेळ मागतोय; जुगार खेळण्यासाठी नाही! विद्यार्थ्यांनी
जगतगुरू संत तुकाराम महाराज अभ्यासिकेत २ तास वेळे वाढवून, स्वच्छतेचा, स्वच्छ्ता गृहासाठी वापरण्याच्या पाण्याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर्याने घ्या अथवा काळ्या फिती घालून अभ्यासिकेत अभ्यासकरून प्रशासनाचा निषेध करू अशी माहिती अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी दिली.
विद्यार्थ्याना येणाऱ्या समस्या व मागणी
१) अभ्यासिकेची असलेली भली मोठी फी कमी करावी
२) अभ्यासिकेच्या परिसरात असलेली दुर्गंधी, अभ्यासिकेच्या इमारतीच्या माघे कचऱ्याचा असलेला धिग व शेजारील मुत्री घरापासून होणाऱ्या दुर्गंधीवर प्रशासनाचा निष्काळजीपणा.
३) अभ्यासिकेत महिला कर्मचारीसहित अनेक विद्यार्थिनी आहेत तर तेथील विद्यार्थ्यांना स्वच्छतेसाठी, अर्थात शौचालय आहे पण पाणी नाही अशी स्थिती.
५) इमारतीमध्ये पिण्याच्या पाण्याची दुरवस्था असल्याची दिसून आले
चौकट
उपमुख्यधिकरी ठाकरे यांची विद्यार्थ्यांना उद्धटपणाची भाषा?
उपमुख्यधिकरी ठाकरे अभ्यासिकेला भेट वजा कामाकरीता आले असताना विद्यार्थ्यांनी त्यांना वेळ वाढून द्या अशी विनंती केली तेव्हा अभ्यासिका माझ्या घरची नाही, मी इथला मालक नाही, नंतर तोल सावरत मुख्याधिकार्यांसोबत बोलून सांगतो असे उद्धटपणाचे बोल विद्यार्थांना बोलले.