*ब्रेक द चेनमध्ये लागू नियमांमध्ये अद्यापपर्यंत कुठलाही बदल नाही – अफवांवर विश्वास ठेवू नका* *

1989

 

राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेल्या निर्बंधात अद्यापपर्यंत कुठलाही बदल नाही. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने
जिल्ह्यातील आधीचे लॉकडाऊन, उपाययोजना व आताची संपूर्ण स्थितीबाबत व्हीडिओ कॉन्फरन्स बैठकीत शासनाला अवगत केले आहे. याबाबत कुठलाही निर्णय झाल्यास प्रशासनाकडून वेळीच जाहीर केले जाईल.
*अफवांवर विश्वास ठेवू नका*
दरम्यान, लॉकडाऊन खुले झाल्याचा चुकीचा संदेश सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही जुने ग्राफिक्स प्रसारित होत असल्याचे आढळले आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये व शांतता, संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
०००

जाहिरात