*होमिओपॅथी दिन श्री‌. माऊली होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये उत्साहात* साजरा

186

 

बुलढाणा ( ): होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युएल हॅनिमन यांच्या जयंतीनिमित्त येथील श्री. माऊली होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये जागतिक होमिओपॅथी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
जगाला निसर्गाच्या शैलीने जाणारी, वेदनारहीत, दुष्परीणाम विरहीत होमिओपॅथी ही उपचार पध्दती प्रदान करणाऱ्या डॉ. सॅम्युएल हॅनिमन यांची जयंती जगभरात होमिओपॅथी दिन म्हणून साजरी करण्यात येते. येथील सुप्रसिध्द होमिओपॅथी तज्ञ डॉ. दुर्गासिंग जाधव यांच्या श्री. माऊली होमिओपॅथिक हॉस्पिटल ॲंड रीसर्च सेंटर येथे यानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करुन डॉ. सॅम्युएल हॅनिमन यांच्या प्रतिमेला हाॅस्पीटलचे संचालक डॉ. दुर्गासिंग जाधव, संचालिका डॉ. सौ. निलिमा जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी हाॅस्पीटलचे कर्मचारी रवी शेवाळे, रामेश्वर सोळंकी, ज्ञानेश्वर पवार, एकनाथ दिशागज यांच्यासह शेख रियाज, सविता आराख, रवींद्र तायडे उपस्थित होते.
होमिओपॅथी दिनानिमित्त श्री. माऊली होमिओपॅथिक हॉस्पिटलच्यावतीने तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या औषधींचे मोफत वाटप करण्यात आले. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षापासून आतापर्यंत ४५ हजारांहून अधिक नागरीकांना हाॅस्पीटलतर्फे रोगप्रतिकारक औषधींचे मोफत वाटप करण्यात आले आहे.

जाहिरात