जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाने दगावलेल्या रुग्णांचा संख्यात वाढ – पहा यादी

0
2155

 

अमरावती, दि. १३ : जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाचे ८ रूग्ण दगावले आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार,

१. येरला, अमरावती येथील ४० पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
२. वरुड येथील ६१ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
३. नेर पिंगलाई, मोर्शी येथील ५५ वर्षीय पुरुष यांचा PDMC रुग्णालय
४. गाडगे नगर,अमरावती येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा PDMC रुग्णालय
५. होळी चौक, धारणी येथील ८५ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
६. आहुरी, चांदुर रेल्वे, येथील ६० वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
७. मांडवा, चांदुर रेल्वे येथील ६ महिनेच्या बालिकेचा बेस्ट रुग्णालय
८. खापरा, मोर्शी येथील ६० वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

*जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या ७२६ वर पोहोचली आहे.*

०००