*वरुड मध्ये शासकीय कोरोना रुग्णालय सुरु करा –* *डॉ. अनिल बोंडे*

0
1040
Google search engine
Google search engine

 

आज कोरोनाची भयावह स्थिती आहे. वरुड मधील रुग्णांना अमरावती किव्हा नागपूर मध्ये बेड मिळत नाही. खाजगीमध्ये उपचार करण्याची ताकद नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पुढाकार घेऊन मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात २० खाटांचे Oxygen Bed कोरोना रुग्णासाठी उपलब्ध करून दिले. त्यापेक्षा कॉग्रेसच्या लोकांनी कोरोनाचे बेड नकोत म्हणून आंदोलन केली. परंतु तेच Oxygen Bed मुळे मोर्शीतील नागरिकांना सुविधा मिळत आहे व उपचार उपलब्ध झाले आहे. वरुडमध्ये डॉ. अनिल बोंडे यांना विनंती केली परंतु वरुडच्या आमदारांनी कोणताही रस दाखविला नाही.
आज सुद्धा वेळ गेलेली नाही. पुढील काळामध्ये कोरोनाच्या परिस्थितीबाबत सांगता येत नाही. तज्ञ लोक तिसऱ्या लाटेची संभावना व्यक्त करीत आहे. अशा विपरीत परीस्थितीत ग्रामीण भागातील जनतेला वाचविण्याकरिता वरुड येथे शासकीय कोविड रुग्णालय सुरु करणे आवश्यक आहे. खाजगी रुग्णालयात जाण्याची सामान्य माणसाची ताकद नाही.
करिता जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांनी तातडीने लक्ष टाकून नवीन तहसील इमारत, पशुवैद्यकीय दवाखाना किंवा अन्य इमारतीमध्ये ऑक्सिजन बायप्याप ची व्यवस्था करून कोविड रुग्णालय सुरु करावे व वरुड तालुक्यातील जनतेचे प्राण वाचवावे ही विनंती माजी कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी केली आहे.