फ्रीडम शाळेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

0
879
Google search engine
Google search engine

आकोट :- स्थानिक गजानन नगर स्थित फ्रीडम मराठी शाळा , आकोट मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.सर्व प्रथम कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना कुंकूम तिलक , हारार्पण व दिपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच शाळा समिती अध्यक्ष प्रविण झाडे, मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका आर.एन.करुले , एस.एम.चांदुरकर यांच्या सह सर्व शिक्षक आदींची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. शितल लठाड तर आभारप्रदर्शन दादाराव शेंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व शिक्षकांनी सहकार्य केल्याचे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे .