शहरातील वाल्मीक नगर येथे परिसर स्वच्छता व पेन पुस्तकांचे वाटप करुन आंबेडकर जयंती साजरी

0
992
Google search engine
Google search engine

आकोटः शहरातील वाल्मिक नगर मेहतर गृपच्या वतीने डॉ.बाबा साहेब आंबेडकर जयंती निमित्त परिसरातील स्वच्छता करण्यात येऊन लहान मुलांना पेन, पेन्सिल व पुस्तकाचे वाटप दि.१४ एप्रिल रोजी करण्यात आले.स्वच्छता व पेन पेन्सिल वाटपाच्या अभिनव उपक्रमातुन वाल्मिक नगरातील तरुणांनी उत्साहात आंबेडकर जयंती साजरी केली

यावेळी तरुणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम संजय मर्दाने , राहुल नकवाल , विजय चावरे , दिनेश मर्दाने , भरतराज मर्दाने , अजय मोगरे , संदीप मर्दाने , चेतन मोगरे , आनंद मर्दाने , यश गोहर , विजय सारवन , राकेश मर्दाने भरत चावरे ,

श्रीकांत मर्दाने , युवराज सारवन , आकाश मर्दाने , जस्पाल मर्दाने , प्रशांत मर्दाने आदी मेहतर गृपच्या   युवकांनी राबवला.या आगळ्या वेगळ्या आंबेडकर जयंती उत्सवाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.