*_बच्चुभाऊ कडू यांच्या संकल्पनेची मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा_* *पाणंद रस्ते : दोन तालुक्यात 600 किमीचे पाणंद रस्ते*

0
1015
Google search engine
Google search engine

 

*_‘पाणंद रस्ते’ लोकचळवळ म्हणून उभारण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी_*

_अचलपूर, दि. १५ : बळीराजा हा बारा महिने शेतात राबतो, पीक हाती लागावे म्हणून शेतात दिवसरात्र खूप कष्ट करतो. शेतकऱ्यांनी राबराबून पिकविलेला शेतमाल बाजारपेठेत पोहचविण्यासाठी शेतशिवारातील पाणंद रस्ते हे शेतकऱ्यांसाठी अगदी कळीचा प्रश्न आहे. या प्रश्नाची तिव्रता जाणून राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी तालुक्यांत पाणंद रस्त्यांचे जाळे निर्मितीसाठी विशेष प्रयत्न केले. राज्यमंत्री श्री. कडू यांची पाणंद रस्त्याची संकल्पना ऐतिहासिकच नव्हे तर शेतकऱ्यांना समृद्धी देणारी ठरेल, अशी प्रसंशा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 600 किमी पाणंद रस्त्यांचे उदघाटन करतेप्रसंगी केली._

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर व चांदुरबाजार तालुक्यातील 600 कि.मी. लांबीच्या पाणंद रस्त्याचा उद्घाटन सोहळा बुधवारी (ता.14) संपन्न झाला. दोन्ही तालुक्यातील सुमारे 117 गावांतील 600 किमी लांबीच्या पाणंद रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. रस्ते निर्मितीसाठी स्वतः बच्चुभाऊ कडू यांनी त्यांच्या आमदार निधीतून 1 कोटी 44 लाख 43 हजार 560 रुपयाचा निधी दिला. याव्यतिरीक्त पालंकमंत्री पाणंद रस्ते योजनेतून 5 कोटी 60 लाख, मनरेगातून 4 कोटी 2 लाख रूपयाचा निधी पाणंद रस्ते निर्मितीसाठी मिळाला आहे.

राज्यमंत्री श्री कडू यांच्या संकल्पनेतून तालुक्यात निर्माण होणाऱ्या पाणंद रस्त्यांसाठी तसेच हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वी होण्यासाठी अधिक निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. जिल्ह्यात पाणंद रस्त्यांची कामे वेळेत आणि योग्य पद्धतीने पूर्ण व्हावीत तसेच या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल बाजारपेठपर्यंत पोहोचविणे सोईचे होण्यासाठी ग्रामस्तर, मंडळस्तर व तालुकास्तरीय समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्रीस्तरीय समिती निर्मितीचा निर्णय होताच, उत्कृष्ट काम करणाऱ्यांना तीन्ही स्तरावर पुरस्कार दिले जाणार असल्याचे निश्चित केले. पाणंद रस्त्यांची कामे गतीने व्हावीत, शेतकरी व गावातील लोकांचा त्यात सहभाग वाढावा, कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावीत तसेच शेतकरी बांधवांची यातून कायमची सुटका व्हावी, या उद्देशानेच योजनेचा पाया रोवण्यात आला आहे. राज्यमंत्री कडू यांचा शेतकऱ्यांप्रती असलेला कळवळा, योजनेच्या फलश्रुतीची दूरदृष्टी दिसून आली आहे. या प्रसंगावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसह मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांनी या योजनेची प्रसंशा केली आहे. पाणंद रस्ते ही एक लोक चळवळ म्हणून उभारण्यात यावी, अशी मागणीच यानिमित्ताने सर्वांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

00000