आकोट शहरातला खाकीतला देवदुतःपोलीस अंमलदार हींम्मत दंदी

0
1072

अकोट :पोलीस म्हटले कि दगदग धावपळ आपसूकच आले आहे. पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार हे किती तणाव पूर्ण आहे हे त्यांनाच माहित आहे. त्यांना माहित आहे की कोरोना साथीच्या आजारामुळे हे स्वतःचे जीवन धोक्यात टाकून आपल्या कुंटुबाचा विचार न करता असेच पोलीस अंमलदार हिम्मत दंदी ब नं. १५४० पोलीस स्टेशन अकोट शहर हे त्यांचे कर्तव्यात कुठलीही शंका नाही. ते कर्त्यव्यावर हजर असतांना त्यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना एटीबस मध्ये त्याचा प्रवास सुरळीत व्हावा व मुलीची छेडखाणी होवू नये म्हणून पहिले ते शाळेच्या मुलींना व मुलांना एटीबस मध्ये बसून देवून. व नंतर म्हतारे लोक यांना सुद्धा आणि प्रवाशांना सुद्धा एटीबस बसून देतात. ते त्यांचे कर्तव्य बजावत आहेत त्या बाबत त्याचे न्यूज चॅनलवर सुद्धा नाव झळकले आहे. विद्यार्थी व पालक वर्गात आनंद दिसून येत आहे. तसेच गरजू विद्यार्थाला शाळेचे व स्पर्धा परीक्षांचे पुस्तक ते आपल्या कडून देतात. व गरजू पीडितांची मदत करतात. रुग्णाना आपल्या परीने आर्थिक मदत करतात. एवढेच नव्हे तर त्याच्या रात्रीच्या गस्त दरम्यान कर्तव्यावर हजार असतात. एखादा पेशंट दवाखान्यात येतांना दिसलाच तर त्यांचे सोबत रात्रीला स्वतः जाऊन डॉ. साहेब यांना विनंती करून त्या पेशंटच्या ईलाजा करिता मदत करतात तसेच रात्रीच्या दरम्यान कोरोना महामारीच्या काळात त्यांनी जनसेवेचे कार्य अखंडपणे चालू ठेवत आहे. तसेच त्या पो.हे.कॉ. हिम्मत दंदी यांनी कोरोना महामारीच्या काळात अकोट शहरात येणारे फोर व्हीलर वाहन इंधन संपल्यामुळे त्यांना पुढील मार्गास जाण्यास अडथळा निर्माण झाल्यामुळे त्याची रात्री गस्त दरम्यान नासिक वरून फोर व्हीलरने तसेच एक कुटुंब नाशिक ते अकोट मार्ग परतवाडा येथे जात असता त्यांचे गाडीचे डिझेल अकोट येथे संपले असता ती वेळ २.१५ मी. रात्री ची होती. ते स्वतः त्या गाडी जवळ जाऊन त्यांना त्यांची अडचण विचारली व तर ड्रायव्हरने सांगितले कि गाडीचे डिझेल संपले म्हणून येथे थांबलो आहे. रात्रीची वेळ सर्व बंद परंतु पो.हे.कॉ. हिम्मत दंदी यांनी त्यांचे सोबत डिझल पंप वर जाऊन संबंधित पेट्रोल पंप धारक यांना उठवून संबंधित गाडी मालकांना डिझेल दया अशी विनंती केली त्यामुळे त्यांना डिझेल मिळाले व त्या गाडीतील कुटूंबानी पो.हे.कॉ. हिम्मत दंदी यांचे आभार मानले अकोट शहर पोलीस स्टेशनला खूप कमी दिवसात त्यांचे कार्य पाहून लोक त्यांचे कैतुक करतांना दिसतात कोरोना महामारीच्या काळात त्यांनी कोरोना योद्धा हा पुरस्कार सुद्धा देऊन त्यांना सनमानीत करण्यात आले आहे. इतकेच नाही तर त्यांचा तेल्हारा तालुक्यात सुद्धा वारखेड येथे कोरोना योद्धा म्हणून सत्कार व प्रशास्त्री पत्र देण्यात आले आहे. अकोट शहरात सुद्धा सेवाभावी संस्था कडून कोरोना योद्धा म्हणून सत्कार व प्रशस्त्री पत्र देण्यात आले आहे, ते मनमिळावू स्वभावाचे असून त्यांनी इतकेच नाही तर विधवा मुस्लिम समाजाचे महिलेला राशन कार्ड सुद्धा बनवून त्यांचे घरी नेऊन दिले आहे. तसेच गोर गरीब विद्यार्थी यांचे टीवशन ची फी सुद्धा कमी करून त्या विद्यार्थाला मदतीचा हात देतात त्यांचे कार्य पाहून अकोट येथील नागरिक त्यांचे कैतुक करीत आहे. त्यांचे कार्यास सलाम त्यामुळे त्यांचे कार्यामुळे पोलीस प्रतिमा चांगली उमटून येत आहे. त्यांचा स्वभाव मनमिळावू वूत्तीचा आहे. ते दुःखितांच्या अडीअडचणी समजून घेतात त्यांना आपल्या कडून काय मदत करताता येईल व सहकार्य करतात समाजातील प्रत्येक घटका पर्यंत पोलीस विभागा बाबत चांगले मार्ग दर्शन करतात. वंचित उपेशीत समाजाचे कार्यात सतत अग्रेसर असतात. त्यांचा मा. तहसीलदार हरीश गुरव साहेब यांचे हस्ते सन्मान करण्यात आला आहे. त्यांना पोलीस निरीक्षक संतोष महल्ले साहेब यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत राहते. तसेच ते शाळा व महाविद्यालय येथे मुलांना मोटीवेट करण्यासाठी मुलांना मार्गदर्शन करतात. कृषी विद्यालय, नर्सिंग विद्यालय , आस्कीकीडस, विद्यामंदिर स्कुल ई. शाळा व कॉलेज मध्ये मुलांना स्पर्धा परीक्षा व पुढे काय करायचे या बाबत सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले आहे. व्यसन मुक्तीवर सुद्धा महाविद्यालयीन युवकांना सुद्धा व्यसन मुक्त कसे राहावे याचे सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन केले तसेच बार्टी (पुणे) तर्फे त्यांना बाभुळगांव व यावलखेड या गावी सुध्दा लोनाना मार्गदर्शन केले चांगला सत्कार सुद्धा करण्यात आला. तसेच उरळ पोलीस स्टेशनला असतानी सुद्धा तेथील विध्यर्थी व शेतकरी व मजूर यांच्या करिता वैद्यकीय शिबिरे घेतले आहे.