प्रा. डॉ. हरिदास आखरे यांची अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषदेच्या अकोला जिल्हाध्यक्ष पदी निवड

0
278
Google search engine
Google search engine

प्रा. डॉ. हरिदास आखरे यांची अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषदेच्या अकोला जिल्हाध्यक्ष पदी निवड

अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषद
ही मराठी अस्मिता टिकविण्यासाठी, मराठी बाणा जोपासण्यासाठी व मराठीला अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी महाराष्ट्रात सातत्याने कार्यरत आहे. सर्व पातळीवर वेगवेगळे उपक्रम राबवून मराठी भाषेचा सर्वोत्तम दर्जा, मराठी भाषेची उंची वाढावी.
सर्व क्षेत्रात माय मराठी ला जगात पोचविण्यासाठी कार्य करणारी ही साहित्य परिषद. या परिषदेच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी डॉ.हरिदास आखरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. जिल्हा सचिव म्हणून डॉ.शिवाजी नागरे व जिल्हा उपाध्यक्ष म्हणून प्रा. पुरुषोत्तम निर्मळ यांची निवड झाली आहे .माय मराठीला अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी सदैव कार्यरत राहू. असा आशावाद नवनिर्वाचित कार्यकारणी ने व्यक्त केला आहे. राज्याध्यक्ष किशोर तळोकार व राज्य सचिव शैलेश काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत , राज्य कार्यकारिणी ची ऑनलाइन सभा घेऊन या सभेत ही निवड घोषित करण्यात आली. या निवडीने नवनिर्वाचित कार्यकारिणी प्रा.प्रवीण उगले प्रसिध्दी प्रमुख, महिला प्रमुख प्रा. पूजा जोशी संघटक डॉ. सौ. गावंडे, कोषाध्यक्ष प्रा. वंदना देशमुख,
निमंत्रित सदस्य प्रा. ज्ञानेश्वर गटकर, मार्गदर्शक ग्रंथपाल श्री अरुण कोरडे व सल्लागार अरुणभाऊ वाघ या सर्वांचे निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.