भारतीय महाविद्यालयात स्वातंत्र्याची 75 वर्ष या विषयावर online Webinar संपन्न

0
1061
Google search engine
Google search engine

 

अमरावती प्रतिनिधी : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठद्वारा संचालित भारतीय महाविद्यालय अमरावती येथे
” भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष ” या विषयावर online Wbenir संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आराधना वैद्य, कार्यक्रमाचे वक्ते डॉ. प्रकाश पवार, राज्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, प्रमुख उपस्थिती डॉ. नीलेश कडू अमरावती जिल्हा समन्वयक ,राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ ,अमरावती. डॉ .प्रशांत विघे , रासेयो कार्यक्रम अधिकारी , प्रा. स्नेहा जोशी महिला रासेयो कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.
सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रशांत विघे यांनी केला, ते म्हणाले की स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर आपण काय मिळवलं यासंदर्भातील यशापयशाचा लेखाजोखा व स्वतंत्र आंदोलनातील महामानवांचे स्मरण हावे यादृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.आराधना वैद्य म्हणाला की,
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात जे महामानव लढले, ज्यांनी स्वातंत्र्याचा संग्राम बघितला, ती पिढी आज जरी अस्तित्वात नसली तरी त्या स्वातंत्र्यसंग्रामातील स्वातंत्र्याची मूल्य आजच्या तरुण पिढीस प्रेरणादायी ठरेल, ती अमूर्त स्वरूपाची मूल्य आपल्या देशाच्या संविधानात प्रतिबिंबित झाली आहेत. त्या मूल्यांची प्रतिष्ठापना करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन केले.
पुढे कार्यक्रमाचे वक्ते प्रकाश पवार बोलताना म्हणाले की, स्वातंत्र्याच्या प्रेरणेची बीजे आमच्या वैभवशाली इतिहासात आढळतात. या वैभवशाली प्रेरणा आमच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या प्रेरणा होत्या. धर्मनिरपेक्षता, परस्परांबद्दल आदरभाव, कल्याणकारी समाजाची निर्मिती करणे याचा अंतर्भाव आपल्या संविधानात झाला आहे. गेल्या ७४ वर्षात त्या साकारण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण अलीकडच्या काळात त्याला धक्का लागतो की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी प्रा.निलेश कडू यांनी विचार व्यक्त करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्वेश पिंप्राळे आभार डॉ.पल्लवी सिंग यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.सुमेध वरघट प्रा. ऋषभ डहाके महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थींनी प्रयत्न केले.