एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंट्स ने घेतला पालक हिताचा निर्णय – नवीन शैक्षणिक सत्रात 80% च शालेय फी

0
832
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी-
स्थानिक एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियांत्स दर्यापूर शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रस्थानी असलेली एकमेव सीबीएसई शाळा असून विद्यार्थी व पालकांचा विश्वास अबाधित राखण्यासाठी सदैव तत्पर असते त्याचबरोबर नवनवीन शिक्षणासंबंधी च्या योजना शाळेमध्ये आणून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयीचे नवचैतन्य निर्माण करत असते.
सत्र 2019 -20 हे करोना वैश्विक महामारी ने ग्रासले असतांना सुद्धा प्रत्यक्ष वर्ग भरवता न आल्यामुळे शाळेने संपूर्ण सत्र अतिशय उत्कृष्ट ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देत अग्रस्थानी ठरली आहे. वर्ग नर्सरी ते इयत्ता बारावी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करत जर काही विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव वर्गाला जोडू शकले नसतील त्यांच्यासाठी ब्रिज कोर्स मार्फत शिक्षणाची व्यवस्था सुद्धा शाळा करून देत आहे ज्यात शाळेव्यतिरिक्त इतरही मुले ऑनलाइन जुळू शकतील. शाळेने वर्षभरात ऑनलाइन पद्धतीने २० आठवडी परीक्षा, ०२ पेरीओडिक परीक्षा व ०२ सत्र परीक्षा यशस्वीरीत्या घेवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यांकन सुद्धा केलेले आहे.
तसेच शालेय प्रशासनाने या नवीन शैक्षणिक सत्रामध्ये शैक्षणिक फी 20 टक्क्याने कमी करण्याचे ठरवले आहे व सदर फी सहज अश्या पाच टप्प्यांमध्ये भरण्याची मुभा दिलेली आहे. शाळेने काही विषयाची पुस्तके जसे कि कॉम्पुटर,व्ह्याल्यू एज्युकेशन,इंग्रजी तसेच हिंदी व्याकरण,जनरल नॉलेज इत्यादी विषय ची मागील सत्रातीलच पुस्तके येत्या सत्राकरिता तीच ठेवून उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करविला जाणार आहे त्यामुळे या विषयाची महागडे पुस्तके विकत घेण्याची नवीन शैक्षणिक सत्र मध्ये गरज नसल्याचे सांगण्यात आले. तसेच बाकी कुठल्याही वर्गाची मागील सत्रात लावलेली पुस्तक यादीमध्ये शाळेने कुठलाही बदल केलेला नाहि. त्याच बरोबर नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रवेश फी लागणार नसून त्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांना आपली मागील वर्षाची पुस्तके दान करायची आहेत अशांनी शाळेत शैक्षणिक माणुसकीची भिंत या उपक्रमात भाग घेऊन आपल्याकडील पुस्तके शाळेत जमा करण्याची उपाय योजना केली आहे तसेच ज्यांनी पुस्तके दान केली त्यांना आपल्या पसंतीची पुस्तके नेण्याची मुभा राहील ज्याद्वारे मुलांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण होईल तसेच अश्या विद्यार्थ्यांना शाळा करोना काळात केलेल्या सामाजिक मदत बद्दल प्रमाणपत्र देवून पुरस्कृत सुद्धा करणार आहे.
*काही महत्वपूर्ण निर्णय*

1) शैक्षणिक फी-सत्र २०२१/२२ साठी २० टक्यांनी कमी
शालेय पुस्तक यादीत कुठलाही बदल नाही कॉम्पुटर,व्ह्याल्यू एज्युकेशन,इंग्रजी तसेच हिंदी व्याकरण,जनरल नॉलेज या विषयाची मागील सत्रातीलच पुस्तके य सत्राला चालतील.
2.) ब्रिज कोर्स द्वारे ऑनलाइन शिकलेल्या व न-शिकलेल्या विद्यार्थ्यान मधील शैक्षणिक गॅप दूर करण्याचा प्रयत्न ज्यात शाळेव्यतिरिक्त इतरही मुले ऑनलाइन जुळू शकतील.
3.) शाळेने आतापर्यंत ऑनलाइन पद्धतीने २० आठवडी परीक्षा, ०२ पेरीओडिक परीक्षा व ०२ सत्र परीक्षा यशस्वीपणे घेतल्यात.