*तरुणांचे लसीकरण सुरू* *ऑनलाईन नोंदणीनंतरच होणार लसीकरण* अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन

2228

 

अमरावती, जि. १ : १८ ते ४४ वयोगटातील तरुणांच्या लसीकरणाला आजपासून आरंभ झाला. जिल्हा रुग्णालयातील ज्येष्ठ नागरिक वॉर्डातील लसीकरण केंद्रात अमरावतीच्या रसिका खाटके या २४ वर्षीय तरुणीने प्रथम लस घेतली.


या लसीकरणासाठी अमरावती जिल्ह्याला साडे सात हजार लस प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयाचा ज्येष्ठ नागरिक वॉर्ड, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, महापालिकेच शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, वरुड ग्रामीण रुग्णालय व अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सुरुवातीच्या टप्प्यात लसीकरण होणार आहे. त्यातील अमरावती शहरातील ३ केंद्रावर आज युवकांचे लसीकरण सुरू झाले. उर्वरित दोन केंद्रावर उद्यापासून लसीकरण सुरू होईल. कोविन ॲपवर नोंदणीकृत तरुण गटातील व्यक्तींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर लसीच्या पुरवठ्यानुसार लसीकरणाचा विस्तार करण्यात येईल, असे डॉ. विनोद करंजीकर यांनी सांगितले.

*ऑनलाईन नोंदणीनंतरच होणार लसीकरण*

या वयोगटातील नागरिकांनी www.cowin.gov.in या संकेतस्थलावर नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर लसीकरणाचा दिनांक व वेळ कळवली जाईल. तसा संदेश संबंधिताला प्राप्त होईल. त्यामुळे कुणीही नोंदणी न करता थेट येऊन लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये. विनानोंदणी लसीकरण होणार नाही. लसीकरणाबाबत नवी केंद्रे आदींबाबत व्यवस्थित व सुस्पष्ट सूचना प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

0000

जाहिरात