मराठा समाजासाठी मोठी बातमी…. मराठा आरक्षण रद्द – सुप्रीम कोर्ट

3153

राज्य सरकारनं बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाकडून रद्द

मुंबई, 5 मे : संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाची (Maratha Reservation)अंतिम सुनावणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पार पडली. आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मराठा समाजाच्या पदरी अखेर निराशा आली आहे. मराठा समाजाला 50 टक्के आरक्षण देणे हे असंवैधानिक आहे, असं न्यायालयाने नमूद केले आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज सकाळी 10.30 वाजता सुनावणी सुरू झाली. मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती नागेश्‍वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट तसंच न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश असलेले घटनापीठापुढे झाली.

’50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देणे हे राज्य घटनेच्या विरोधात आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला देता येणार नाही. 50 टक्के आरक्षण देणे हे उल्लंघन आहे’, असं मत न्यायालयाने नमूद केले आहे.

 

जाहिरात
Previous article*अमरावती जिल्ह्यात व इतर जिल्ह्यात कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची संख्या – , तसेच आजच्या कोरोना रुग्णांची यादी , व आजची कोविड स्थिती डिस्चार्ज रुग्णांची संख्या*
Next articleविनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची पोलिसांनी करवून घेतली करोना टेस्ट