विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची पोलिसांनी करवून घेतली करोना टेस्ट

0
603
Google search engine
Google search engine

अकोलाःकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र शासनाने दिनांक 15 एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रात कडक लॉक डाऊन जारी केले, अत्यावश्यक कामा शिवाय नागरिकांच्या फिरण्यावर बंदी आणून संचारबंदी जारी केली,त्या सोबतच सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून सकाळी 7।00 ते 11।00 वा पर्यंत अत्यावश्यक सेवेची आस्थापने सुरू ठेवली, परंतु ह्याचा गैरफायदा घेण्याच्या प्रवृत्तीत वाढ होऊन नागरिक अत्यावश्यक सेवेच्या नावाने शहरात मुक्त संचार करीत असल्याचे निदर्शनास आल्या वर जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर हे स्वतः रोड वर उतरून एक्शन मोड वर दिसून आले

तसेच शहर वाहतूक शाखेने सुद्धा अश्या नागरिकांवर धडक कारवाई करून 9 हजाराचे वर दंडात्मक कारवाया करून लाखो रुपये दंड वसूल करून जवळपास 400 चे वर वाहने जप्त करून वाहन चालकांवर गुन्हे दाखल केले, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम हे शहरातील सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यां सह एक्शन मोड वर राहूनही शहरात रस्त्यावरील गर्दी कमी न झाल्यामुळे आज कोतवाली चौकात पोलिसांनी मनपा चे सहकार्याने व पावस अजयसिंग सेंगर ह्यांनी स्वतः चे मालकीची लॅक्सरी वाहन टेस्टिंग साठी उपलब्ध करून दिल्याने , शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, कोतवाली पोलीस स्टेशन चे प्रभारी पोलीस निरीक्षक उत्तमराव जाधव, शहर वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कोतवाली चौकात स्वतः थांबून रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची करोना चाचणी करवून घेतली,

जवळपास 150 चे वर नागरिकांची कोविड चाचणी मनपा चे वैद्यकीय चमू कडून करून घेण्यात आली, ह्या वेळी मनपा चे क्षेत्रीय अधिकारी टापरे, हे आपल्या वैद्यकीय चमू सोबत उपस्थित होते,तसेच पावस ट्रॅव्हल्स चे पावस अजयसिंग सेंगर हे सुद्धा जातीने हजर होते।

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत ह्यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, गजानन शेळके ह्यांनी केली।तसेच ह्या नंतर शहरातील प्रत्येक मोठ्या चौकात अशी मोहीम राबवून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोविड चाचणी करवून घेऊन पोसिटीव्ह येणाऱ्यांना GMC मध्ये दाखल करण्यात येईल किंवा गृह विलगीकरन करण्यात येईल। असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम ह्यांनी दिला आहे,