चांदुर बाजार :- गॅस एजेसी धारकाकडुन जिल्हाधिकाऱ्यांचा कडक निर्बंधांचे उल्लंघन – कोण करणार कारवाई – ऍजेसी मध्ये येऊन ग्राहक स्वतः घेऊन जात आहेत सिलेंडर

0
1709
Google search engine
Google search engine

दिनांक :-10-05-2021

 

कल्पना गॅस ऍजेसी मधील प्रकार

पहा जिल्हाधिकारी यांच्या कडक निर्बंधांमध्ये  उल्लेख असलेलं आदेश

चांदुर बाजार :- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता माननीय जिल्हाधिकारी श्री शैलेश नवाल यांनी रविवार पासून जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले ज्या सर्वच दुकाने आस्थापना बंद ठेवण्यात आल्या फक्त मेडिकल व हॉस्पिटल मध्येच सर्वसामान्य व्यक्तींना जाण्यास परवानगी देण्यात आली होती बाकी सर्व गोष्टी या होम डिलिव्हरी देण्यात याव्या असे आदेश प्रशासनाने काढले होते त्यात गॅस ऍजेसी धारकांना देखील आपले सिलेंडर हे ग्राहकांना घरपोच देण्यात यावे असे आदेश देण्यात आले होते.

 

 

कुठल्याही परिस्थिती ग्राहक ऍजसी मध्ये येता कामा नये ऑनलाईन बुकिंग करून सिलेंडर होम डिलिव्हरी द्यावी असे असताना चांदुर बाजार शहरात कल्पना गॅस ऍजसी ने चक्क ग्राहकांना स्वतःच गॅस बुकिंग पावत्या ऍजेसी मधून देऊन त्यांना गोडाऊन मधून सिलेंडर आणण्यास परवानगी दिली आहे यामुळे शहरात रस्त्यावर सिलेंडर घेऊन जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली काही ऑटो मध्ये 5 ते 10 सिलेंडर भरून आणल्या गेले
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गॅस ऍजेसी येथे ग्राहक आढळून आल्यास संबंधित एजन्सी कारवाईस पात्र राहील असे आदेश देण्यात आले होते तरीही जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन जर गॅस एजन्सी करत असतील तर यांच्यावर स्थानिक प्रशासन कारवाई करणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे