पत्रकार व राजकीय नेत्यांच्या पुढाकाराने स्पॉट नोदनी करुन लसिकरणाला सुरवात

0
966
Google search engine
Google search engine

शेगांव :- येथील नगरपालिकेच्या आरोग्य केंद्रावर आज पहाटेपासून लोकांनी करोना आजाराच्या लसीकरणाकरिता लोकांनी एकच गर्दी केली परंतु ऑनलाईन पद्धतीच्या अनियोजन कार्यक्रमामुळे गोंधळ उडालेला पाहायला मिळाला.

सविस्तर वृत्त असे की, लसीकरण केंद्रावरील अधिकाऱ्यांनी ज्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे त्यांनाच लसिकरण होईल अशी भूमिका घेतल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

जेव्हा की, ज्या नागरिकांना ऑनलाईन पद्धती मुळात माहिती नाही व ज्यांच्याकडे मोबाईल, इंटरनेट सुविधा नाही अशांनी नोंदणी कशी करायची हे प्रश्न समोर आला. आणि केंद्रासमोर मोठ्या संख्येने गोर-गरीब, मजूर कास्तकार जनता रांगेत लागले होते सदर बाब त्यावेळी पत्रकार व राजकीय नेते यांना कळताच तेथे उपस्थित झाले त्यावेळी भाजप नेते पांडुरंग बुच यांनी तत्परता दाखवत सर्वसामान्यांचा आक्रोश पाहता भ्रमणध्वनीद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व इतर नेत्यांशी बोलून तात्काळ खोळंबलेल्या लसीकरणाला सुरुवात केली.

लसीकरणा करिता झालेली गर्दी व गोंधळ पाहता तेथील अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले, त्यावेळी उपस्थित पत्रकार यांनी सर्वच राजकीय नेत्यांना भ्रमणध्वनी वरुन परिस्थितीची माहिती दिली, त्यावर भाजप नेते पांडुरंग बुच यांनी लगेच तिथे पुढाकार घेत तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण घोगटे यांनी प्रथम रांगेत उभे असलेल्या जनतेला लसीकरण करायला सुरुवात केली व तेथील परिस्थिती सुनियोजित केली.

मात्र यावेळी स्थानिक प्रभागातील नगरसेवक दिसून आले नाहीत.
आजची परिस्थितीचा धडा घेत शासनाने शासनाने यावर मार्ग काढणे आवश्यक झाले आहे, नाही तर अशी परिस्थिती दररोज निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणाऱ्यांसाठी…

वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण घोंगटे यांनी सांगितले कि, ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यावर फलकावर दिलेल्या वेळेतच लसीकरण होईल तरी ऑनलाइन लसीकरण करणाऱ्या लोकांनी अधिकारी व कर्मचारी यांना सहकार्य करत योजनेचा लाभ घ्यावा अशी सूचना ही केली.