चांदुर बाजारात जिल्हाधिकाऱ्यांचा कडक निर्बंधांना हरताळ – मार्केट मधील दारू च्या दुकानाजवळ सर्वसामान्य नागरिकांची गर्दी ; मद्य व्यवसायिक जागेवरच करत आहेत मद्यविक्री

0
2004
Google search engine
Google search engine

पहा काय आहे जिल्हाधिकारी यांचा आदेश

चांदुर बाजार ::- जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे वाढते प्रमाण पाहता संपूर्ण जिल्ह्यात ९ मे रोजी दुपारी १२ वाजतापासून १५ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला.

आदेशानुसार, *कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.* सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, पीठाची गिरणी आदी दुकाने, तसेच खाद्यपदार्थांची सर्व दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे, अंडी यासह), सर्व प्रकारची मद्यालये, मद्य दुकाने व बार ही दुकाने पूर्णपणे बंद राहतील. _तथापि, या सर्व दुकानांना सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीत घरपोच सेवा चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास दुकानात स्वत: जाऊन खरेदी करता येणार नाही. याबाबत स्थानिक नगरपरिषद/मुख्याधिकारी यांना नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले होते परंतु चांदुर बाजार शहरातील देशी लाईन मध्ये चक्क ग्राहक दुकानात येऊन मद्य विकत घेऊन जात होते खर तर मद्यविक्री व्यवसायिकांना होम डिलिव्हरी देण्याचे आदेश असताना अशा प्रकारे सर्वसामान्य नागरिकांना दुकानजवळच मद्य देणे म्हणजे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अवहेलना करण्याजोगे आहे स्थानिक प्रशासन संबंधितांवर काय कार्यवाही करणार याकडे आता लक्ष लागले आहे