*ज्येष्ठांच्या लसीकरणाला प्राधान्य* -जिल्हाधिकारी शैलेश नवाल _गर्दी टाळा ; कोरोना त्रिसूत्रीचे पालन करा_

0
860
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. ११ : ज्येष्ठांना दुसरा डोस मिळावा यासाठी प्राधान्य देण्यात येत असून आजमिताला उपलब्ध असलेला डोस ज्येष्ठांच्या दुसऱ्या मात्रेसाठी वापरण्यात येत आहे. यापुढे लस उपलब्ध झाल्यानंतर एकूण लसीकरणाबाबत नियोजन करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

जिल्ह्यातील लसीकरण, तसेच शासकीय व खासगी रुग्णालयातील स्थिती व आवश्यक उपाययोजनांबाबत जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे सीईओ अविश्यांत पंडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्यासह अन्य वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचा साठा प्राप्त झाला आहे. शासनाच्या निर्देशानुसार ती ज्येष्ठांना प्राधान्याने दिली जात आहे. लस ही सर्वांनाच टप्प्या टप्प्याने दिली जाणार आहे. तोपर्यंत मास्क, सामाजिक अंतर व सॅनिटायझेशन या कोरोना त्रिसुत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.

श्री. नवाल म्हणाले की, लस ही सर्वांनाच दिल्या जाणार आहे. लसीकरण केंद्रावर टोकण पध्दत राबविण्यात येत आहे. तिथे गर्दी टाळण्यासाठी त्याठिकाणी पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागाला दिले.

0000