*१४ मे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती घराघरात साजरी करावी – शुभम शेरकर*

0
328
Google search engine
Google search engine

Amravati :-

दरवर्षी संभाजी ब्रिगेड व शंभूप्रेमींच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर वेगवेगळ्या समाज उपयोगी तथा प्रबोधन पर कार्यक्रमांनी १४ मे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येते, मात्र मागील वर्षापासून जगावर असलेल्या कोरोनाच्या सावटामुळे सार्वजनिक रित्या जयंती साजरी करण्यात खंड पडला आहे. यावर्षी सुद्धा छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती लॉकडाऊनमुळे सार्वजनिक रित्या शक्य नसून *समस्त शंभुप्रेमींनी घरावर भगवा ध्वज उभारून महाराजांना अभिवादन करावे, संभाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर संपूर्ण कुटुंबासमवेत जिजाऊ वंदना म्हणावी व संभाजी महाराजांच्या जीवनावरील पुस्तक वाचन करून त्यामधील गुण अंगीकारण्याच्या प्रयत्न करावा* अश्या प्रकारे संभाजी महाराजांची जयंती घरा – घरात साजरी करावी असे आवाहन संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शुभम शेरकर यांनी केले आहे.