*पत्रकार बांधवांना ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ घोषित करावे* *पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*

0
1107
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 13 : कोरोना साथीच्या अनुषंगाने पत्रकार बांधव अनेक प्रकारची महत्वपूर्ण माहिती ठिकठिकाणी प्रवास करून संकलित करून ती विविध माध्यमांतून नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करत आहेत. त्यामुळे पत्रकार बांधवांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित करावे, अशी विनंती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

या मागणीचे निवेदन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही दिले आहे.

कोविडकाळात विविध क्षेत्रातील शासकीय कर्मचा-यांप्रमाणेच पत्रकार बांधवांनीही साथ नियंत्रणासाठी मोलाची जबाबदारी पार पाडली आहे व आताही पार पाडत आहेत. माहिती संकलनासाठी त्यांना अनेक ठिकाणी प्रवास करावा लागतो. त्यामुळे पत्रकार, वृत्तवाहिनी प्रतिनिधींना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित करण्याची विनंती पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांना केली आहे.

000