नगर परिषदेच्या आदेशाला ठेकेदारांचा खो!

0
953
Google search engine
Google search engine

कामात हलगर्जीपणा… तरी मुख्याधिकारी गप्प का?

शेगांव:- नगर परिषद मार्फत संतनगरीतील प्रभागात विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून अनेक कामे पूर्णत्वास सुद्धा जात आहेत किंबहूना, नगर परिषदे मार्फत ज्या ठिकाणी विकास कामे सुरू आहेत त्या ठिकाणी पूर्ण कामाचा तपशीलाचा फलक लावावा, असे शासनाचे आदेश असतानासुद्धा विकासक वा ठेकेदारांनी एकही जागी तपशीलाचा फलक लावल्याचा आढळले नाही याचाच अर्थ नगर परिषदेच्या आदेशाला ठेकेदारांचा खो! म्हणावा लागेल…

शेगाव नगर परिषदेत २०१६ साली भाजपाचे पूर्ण बहुमताची सत्ता आली आणि अनेक वर्षापासून थांबलेला गावाचा विकास पूर्ण करण्याचा चंग बांधला गेला, त्यावर कधी नव्हे तेवढे विकास कामे मागील चार वर्षापासून सातत्याने सुरू आहे, आजही अनेक प्रभागात डांबरीकरण, पेव्हरब्लॉक, खुल्या जागेत सौंदर्यीकरन, खुल्या व्यायामशाळा, बगीचा, अभ्यासिका, शॉपिंग कॉम्प्लेक्स अशा कोटींची विकास कामे सुरू आहेत परंतु ती कामे किती रुपयाची आहेत? त्याचा दर्जा? याकडे सत्ताधारी व अधिकारी लक्ष देण्यास अपुरे पडताय असे चित्र दिसत आहे.

अनेक ठिकाणी ठेकेदारांनी कामाची गुणवत्ता दर्जा राखण्यात असमर्थता दिसून आली आहे अशा अनेक तक्रारी नगरपालिकेत आलेले आहेत तर विशेष म्हणजे नगरसेवक, नगरसेविकांनी सुद्धा काही ठेकेदारांच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी मुख्यधिकारी यांच्याकडे केल्याची माहिती आहे तरीही अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना वारंवार सूचना देऊनही विकास कामाचा तपशील फलक लावलेला दिसून येत नाही.

विकास बांधकामाचे व सौंदरीकरनाचे ठेके हे बहुदा सत्तेत आलेल्या नगरसेवकांच्या जवळच्या ठेकेदाराचे आहेत म्हणून कदाचित हे ठेकेदार मुख्यधिकारी यांच्या विकासक नियमांना बगल देत असावेत अशी खमंग चर्चा शेगांव सुरू आहे.

काय आहे विकास तपशील फलक?

कामाच्या सुरुवातीला विकास होणाऱ्या जागेवर हा फलक लावावा लागतो असे नियम आहेत. त्या फलकावर किती रुपयांचे काम आहे, कामाला लागणारा कालावधी, कामाचे इस्टीमेंट, मेंटेनांस अर्थात रखा रखावाचे कामे, दिनांक, विकासकाचे नाव, पत्ता, संस्थेचे नावाचा तपशिल या फलकावर असतो.

ठेकेदारांना तपशील लावण्याचे आदेश दिलेले आहेत:- नगर अभियंता आश्रमा

शेगांवमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या, ज्या ठिकाणी विकास कामे होत आहेत त्या संबंधित ठेकेदाराला आम्ही फलक लावण्याचे आदेश व कामाचा दर्जा चांगला असावा असे सांगितलेले आहे.

न.प.ला नागरी हक्क संरक्षण समितीचे स्मरण पत्र

अध्यक्ष विजय ढगे यांनी संत नगरीतील विकास कामे पाहता काही महिन्यांपूर्वी संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात, सहकार्यान सोबत न. प. मुख्य अधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांना प्रत्येक विकास कामाच्या बाजूला त्या कामाचा पूर्ण तपशील लावा असे निवेदन देऊन स्मरण पत्र दिले होते.

तपशीलाचा फलक हा कायद्याने लावणे बंधनकारक आहे, त्यामुळे जनतेला कामाची माहिती व पारदर्शकता राहते परंतु अजूनही कोटी रुपयांची काम सुरु असून, फलक लावलेला दिसत नाही .या गोष्टी कडे साफ दूर लक्ष केल्या जात असल्याची खंत नागरिक हक्क संरक्षण समितीचे शहराध्यक्ष विजय ढगे यांनी व्यक्त केली.

नगरसेवकांनी गटनेते शरद अग्रवाल यांचा घ्यावा आदर्श:- शेगांवातील नागरिक

मागील महिन्यात न.प.चे गटनेते शरद अग्रवाल यांनी ठेकेदाराकडून त्यांच्या वार्डात रत्याचे काम व्यवस्थित न केल्यामुळे सदर काम पुन्हा करून घेतले ह्या कामाची पॉझिटिव्ह दखल स्थानिक नागरिकांनी घेतली आहे आणि आपल्या नगरसेवकाला यांचा आदर्श घ्या असा सल्ला देखील नागरिक देत आहेत.