एफ एम काशेलानी स्कूल च्या विद्यार्थ्यांचा व्हिएतनाम देशातील विद्यार्थ्यांशी संवाद.

0
519
Google search engine
Google search engine

 

शेगांव:- स्थानिक शेगांव येथील एफ एम काशेलानी इंग्लिश मिडियम स्कूल लॉकडाउन मध्ये सुद्धा विविध यशस्वी प्रयोग करून आपल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शाळेने व्हिएतनाम देश येथील एका शाळेतील विद्यार्थ्यांचा आपल्या काशेलानी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणला. व्हिएतनाम हा देश जापान सारखा टेक्नोलॉजी मध्ये प्रसिद्ध असुन एका बाजूला थाईलैंड, कँबोडिया असे देश तर दूसऱ्याबाजुने महासागराने वेढलेला आहे. या संवादामध्ये मध्ये विविध गमतीदार स्पर्धा, आपापल्या देशातील महान व्यक्तित्वांबद्दल चर्चा, या आणि अशा बाबी घडून आल्या. गूगल मीट द्वारे झालेल्या या संवादात शाळेतील वर्ग ३ च्या निवडक १२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. व्हिएतनाम येथील ‘व्हिनस्कूल थँग लाँग’ या शाळेतील या ‘लू तुएत लुंग’ शिक्षिकेने हा संवाद घडवून आणण्यासाठी सहकार्य केले. संचालक कुणाल काशेलानी सरांच्या मार्गदर्शनात हा संवाद यशस्वीरीत्या पार पडला. यामध्ये काशेलानी शाळेतर्फे श्री कुणाल काशेलानी सर, कंचन काशेलानी मॅडम, शुभम देशमुख सर आणि १२ विद्यार्थ्यांनी तर व्हिनस्कूल थँग लाँग या शाळेतर्फे लू तुएत लुंग मॅडम सह २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. “आंतरराष्ट्रीय पातळीवरील अशा प्रकारच्या संवादाने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास चांगल्या प्रकारे वाढतो, तसेच कल्पनाशक्तीही वाढण्यास मदत होते. त्यामुळे भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम घावेत”. असे मत कार्यक्रमाच्या यशस्वीतेनंतर शाळेचे अध्यक्ष श्री मनोज काशेलानी सरांनी व्यक्त केले.