*तेरा देशात घेण्यात आलेल्या नेल्टस इ कॅट ग्रँड फिनाले परीक्षेत पटकाविला एकविराच्या स्वामींनी ताकोते ने तृतीय क्रमांक*

295

प्रतिनिधी-
13 देशांमध्ये घेण्यात आलेल्या नेल्टस इ कॅट ग्रँड फिनाले परीक्षेत एकविरा स्कुल, दर्यापूर च्या विद्यार्थिनीने पटकाविला तृतीय क्रमांक सदर परीक्षा ही 2020-21 या शैक्षणिक सत्रामध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेला 13 देशातील विद्यार्थी समाविष्ट करण्यात आले होते 13 देशांमध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेमधून एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंट्स ची विद्यार्थिनी स्वामिनी ताकोते हीने तिसरा नंबर पटकावला आहे सदर परीक्षा ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंग्रजी भाषेवर आधारित प्रश्नोत्तरावर घेण्यात आली होती या परीक्षेची काठीण्य पातळी अति जास्त असल्यामुळे या परीक्षेमध्ये सीबीएसइ शाळे मधूनच अधिकाधिक विद्यार्थी परीक्षा देत असतात या परीक्षेमध्ये भाग घेण्यासाठी एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंस्ट दर्यापूर मधून वर्ग पहिली ते आठवीच्या सुमारे शंभर च्या वर विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता या परीक्षेमध्ये सात विद्यार्थी विशेष प्रावीण्य प्राप्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले स्वामिनी ताकोते हिने 96. 88 टक्के, अर्णव कानुंगो 93 .75 टक्के, आरुष झुनझुनवाला 83, वार्षनेय लकडे 70 टक्केवारी गुण घेऊन एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंट्स चे नाव यशोशिखरावर पोहोचविले यासाठी शाळेमधून शालेय शिक्षक दिपाली देशमुख, वैशाली ठाकरे ,श्वेता लाखे, गजेंद्र देशमुख यांनी परिश्रम घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे या विद्यार्थ्यांना एकविरा शाळेच्या प्राचार्य तुषार चव्हाण व संचालक मंडळाकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

जाहिरात