*महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शुल्क भरण्यासाठीची सक्ती थांबवा*

0
579

 

कोणताही विद्यार्थी परिक्षेपासुन वंचित राहता कामा नये.- प्रहार विद्यार्थी संघटनेची मागणी

प्रतिनिधी:- अमरावती
दि.07-06-2021

 

महाविद्यालये बंद असूनही सक्‍तीची फी वसुली केली जात असल्याच्या विरोधात व कोणताही विद्यार्थी परिक्षेपासुन वंचित राहु नये यामागणीसाठी प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने जिल्हाप्रमुख आकाश खारोडे यांच्या नेतृत्वात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कुलगुरु साहेब यांना निवेदन देण्यात आले.कोरोना संकटामुळे सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटली आहे. टाळेबंदीमुळे ग्रामीण भागातील व्यवसाय व उद्योग ठप्प असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक समस्यांना समोरे जावे लागत आहे. काही महाविद्यालये महाविद्यालयीन फी भरल्या शिवाय परिक्षा फॉर्म भरू देणार नाही. किंवा परीक्षेला बसू देणार नाही. असे अनेक महाविद्यालये विद्यार्थ्याना व पालकांना सांगत असल्याचे दिसून आले आहे. या कोरोना महामारीत बर्यासस्या विद्यार्थ्यांचे कुटुंब उध्वस्त झाले आहे.अनेक पालकांचे रोजगार बुडाले आहेत. अश्या गंभीर परिस्थितीत सुद्धा अनेक महाविद्यालय विद्यार्थ्याना प्रवेश फी भरण्यासाठी तगाता लावत आहेत. लवकरात लवकर फी भरली नाही तर परिक्षा फॉर्म घेणार नाही अश्या सुचना सुद्धा महाविद्यालयाकडून विद्यार्थ्याना व पालकांना देण्यात येत आहे. बळजबरीने फी वसुल करणार्या महाविद्यालयांना लवकरात लवकर थांबवा व कोणताही विद्यार्थी परिक्षेपासुन वंचित राहता कामा नये अन्यथा प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहार विद्यार्थी संघटना जिल्हाप्रमुख आकाश खारोडे यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदनाद्वारे दिला.