ऑटो चालकाचा प्रामाणिकपणा, गरीब शेतकऱ्याचे महत्वाचे कागदपत्रे व कपडे असलेली पिशवी केली परत शहर वाहतूक शाखेचे प्रोत्साहन

130

अकोला शहरात चालणाऱ्या ऑटो च्या चालकां मध्ये आता हळू हळू प्रमाणिकतेची चळवळ सुरू झाली असून ऑटो मध्ये राहिलेली एका गरीब विधवा महिलेची दागिने असलेली पर्स ऑटो चालकाने परत करण्याची घटना ताजी असतानाच आज परत एकदा ऑटो चालकाने त्याचे ऑटो मध्ये राहिलेली एक पिशवी ज्या मध्ये शेतीचे मूळ कागदपत्रे, आधारकार्ड, बँक पास बुक असे महत्वाचे कागदपत्रे व कपडे असलेली पिशवी परत करून आपल्या प्रमाणिकतेचा परिचय दिला आहे।

प्रकरण असे की खडकी येथील माणिकराव संपत पोफळे हे वयोवृद्ध शेतकरी पीक कर्ज संभधाची कामे करण्यासाठी तसेच शेतीला लागणारी आवश्यक बी बियाणे खरेदी करण्यासाठी अकोला येथे येऊन बँकेत जाण्यासाठी ऑटो केला असता घाईगर्दीत महत्वाची मूळ कागदपत्रे व काही कपडे असलेली पिशवी ऑटो मध्येच राहून गेली, काही वेळाने ऑटो चालक मोहम्मद समीर रा सिंधी कॅम्प ह्याचे लक्षात ही बाब आल्यावर त्याने सदर पिशवी शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणली असता, शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांनी आधार कार्ड व बँक पास बुक वरून नमूद वृद्ध शेतकऱ्याचा शोध घेऊन त्यांना वाहतूक कार्यालयात बोलावून ऑटो चालक मोहम्मद समीर ह्याचे हस्ते सदर पिशवी वृद्ध शेतकरी माणिकराव पोफळे ह्यांचे सुपूर्द केली असता त्या वृद्ध शेतकऱ्याने ऑटो चालक व वाहतूक पोलिसांचे आभार व्यक्त करून ह्या कागडपत्रा अभावी ह्या वर्षी पीक कर्ज भेटू शकले नसते व पेरणी चा खोळंबा झाला असता अशी भावना व्यक्त केली।

ऑटो चालकांनी प्रमाणिकतेची ही चळवळ अशीच सुरू ठेवून सर्व सामान्य नागरिक व महिला ह्यांचा विश्वास संपादन करावा असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी अकोला शहरातील ऑटो चालकांना केले आहे।

जाहिरात