*पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर शुक्रवारी करणार* *ग्रामीण आरोग्य यंत्रणेची पाहणी*

689

 

_*अमरावती, दि. १० : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर या शुक्रवारी (दि. 11) विविध ग्रामीण रुग्णालयांना भेट देऊन तेथील स्थितीचा आढावा घेणार आहेत*._

त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : सकाळी 6.35 वाजता अकोला रेल्वेस्थानकावर आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे रवाना, सकाळी 6.45 वाजता अकोला शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, सकाळी 8.30 वा. दर्यापूरकडे रवाना, सकाळी 9.30 वाजता दर्यापूर ग्रामीण रूग्णालय व कोविड सेंटरला भेट. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित असतील.

सकाळी 9.45 वाजता काँग्रेसचे दर्यापूर तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्यासमवेत पक्षाच्या कोविडसंबंधित कार्यक्रमाचा आढावा, सकाळी 10.15 वा. दर्यापूरहून अचलपूरकडे प्रयाण, सकाळी 11.15 वाजता अचलपूरला आगमन व रुग्णालय, कोविड सेंटरला भेट, सकाळी 11.30 वा. अचलपूर तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्यासमवेत पक्षाच्या कोविडसंबंधित कार्यक्रमाचा आढावा, दुपारी 12 वाजता चांदूरकडे प्रयाण, दुपारी 12.30 वाजता चांदूर बाजार येथे आगमन व ग्रामीण रुग्णालय व कोविड सेंटर येथे भेट, दुपारी 12. 45 वा. चांदूर बाजार तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्यासमवेत पक्षाच्या कोविडसंबंधित कार्यक्रमाचा आढावा, दुपारी 1.15 वाजता लेहगाव मार्गे तिवस्याकडे प्रयाण.

दुपारी 1.35 वा. लेहगाव येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा तालुका काँग्रेसतर्फे स्वागत समारंभ, दुपारी 2.15 वाजता तिवसा शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, दुपारी 2.30 वाजता तिवसा ग्रामीण रुग्णालय व कोविड सेंटरला भेट, दुपारी 2.45 वाजता तिवसा तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्यासमवेत पक्षाच्या कोविडसंबंधित कार्यक्रमाचा आढावा, दुपारी 3 वाजता तिवसा येथील जयश्री मंगल कार्यालय येथे राखीव, दुपारी 3.30 वाजता शासकीय वाहनाने धामणगावला रवाना, दुपारी 4.15 वा. धामणगाव रेल्वे येथे आगमन व ग्रामीण रुग्णालय, कोविड सेंटर भेट, सायं. 4.30 वा. धामणगाव रेल्वे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्यासमवेत पक्षाच्या कोविडसंबंधित कार्यक्रमाचा आढावा, सायंकाळी 5 वाजता शासकीय वाहनाने धामणगाव रेल्वे येथून अमरावतीकडे प्रयाण, सायंकाळी 6 वाजता अमरावती निवासस्थान येथे आगमन व राखीव.

000

जाहिरात