अवैध वाळूसंदर्भात वृत्तपत्रात बातम्या छापून आल्यामुळे संतप्त वाळू माफियाने गुंडासह जाफराबाद येथील दैनिक पुढारीचे पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर शुक्रवारी भ्याड हल्ला करून, बेदम मारहाण केली.

1536

 

● अवैध वाळूसंदर्भात वृत्तपत्रात बातम्या छापून आल्यामुळे संतप्त वाळू माफियाने गुंडासह जाफराबाद येथील दैनिक पुढारीचे पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर शुक्रवारी भ्याड हल्ला करून, बेदम मारहाण केली.

या मारहाणीत ज्ञानेश्वर पाबळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जालना येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची इजा झालेली असल्यामुळे त्यांना औरंगाबादला हलविण्यात आले आहे.

पोलिसांनी याप्रकरणात हल्लेखोर वाळूमाफिया आणि त्याच्या गुंडावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

जाहिरात
Previous articleआजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत
Next articleराज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते पेरणीचा शुभारंभ , विधीवत बैल तिफण पुजन