शहरातील मलकापूर सनसिटी परीसरात क्रीकेट खेळणाऱ्या मुलांना दिसला दुर्मिळ मांडुळ जातीचा साप

0
1803
Google search engine
Google search engine

अकोलाःशहरातील मलकापूर येथील सनसिटी येथे मुले दि.१५ जुन रोजी क्रिकेट खेळत असतांना त्यांना दुर्मिळ असा दोन तोंडाचा मांडूळ जातीचा साप दिसला, ह्याची माहिती नागरीकांद्वारा खदान पोलीस स्टेशनला देण्यात आली,

माहीती मिळताच तात्काळ प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी त्वरित सदाशिव मार्गे, कपिल राठोड, राजेश वानखडे, धीरज वानखेडे ह्यांना घटनास्थळी पाठविले, पोलीस कर्मचारी ह्यांनी सर्पमित्रांच्या मदतीने सदर सापाला पकडुन जीवनदान दिले.

सदर मांडुळ जातीचा साप जवळपास ३ ते साडेतीन फुट लांब होता.या सापास सुरक्षित पकडुन वन विभागाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहीती आहे.