मोटार सायकल चोरीच्या मोठया रॅकेट मध्ये सापडलेल्या गाड्यांचे क्रमांक व चेसिस नंबर

0
1408

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोटारसायकल चोरीचं प्रमाण वाढलं होतं. या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं. चांदुर बाजार तालुक्यात मोटारसायकल चोरीच्या घटना जास्त समोर येत होत्या. अखेरीस अमरावतीमधील तीन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे कामगिरी करत हे रॅकेट उध्वस्त केलं आहे.

पोलिसांनी आपल्या सर्व खबऱ्यांना कामाला लावत कारवाईसाठी जाळ पसरलं. यातून मिळालेल्या माहितीनुसार, ब्राम्हणवाडा थडी हद्दीतील सोनेरी या गावातील २२ वर्षीय तरुण उज्वल बोराडे याला ताब्यात घेण्यात आलं. चौकशीमध्ये उज्वलने आपला गुन्हा कबूल करत पवन वाहने याला चोरीच्या मोटारसायकल विकल्याचं मान्य केलं. यानंतर चांदूर बाजार पोलिसांनी पवनला ताब्यात घेतल्यानंतर या गुन्ह्यातले पुढचे गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकत गेले.

 

मोटार सायकल चोरल्यानंतर बनावट RC बुक आणि कागदपत्रांद्वारे ही मोटारसायकल दुसऱ्यांना विकणाऱ्या आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. या धडक कारवाईत पोलिसांनी सात आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून २९ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व मोटारसायकलची किंमत २० लाखांच्या घरात आहेत.