*विदर्भकन्या कु.श्रुती रविप्रकाश भांडे हिची सा रे ग म प लिटिल चॅम्प्स मध्ये निवड.*

0
2255
Google search engine
Google search engine

अकोला :-


अकोल्यातील कु. श्रुती रविप्रकाश भांडे हिची
झी मराठी वाहिनीवर सुरु होणाऱ्या सारेगमपा लिटिल चॅम्प्स या रियालिटी शोमध्ये निवड झाली आहे.
श्रुती ही विदर्भातून निवड झालेली एकमेव स्पर्धक आहे.आतापर्यंत सा रे ग म प लिटिल चॅम्प्स मध्ये निवड झालेल्या स्पर्धकांपैकी ही सर्वात लहान स्पर्धक असून तिचे वय केवळ सात वर्षे आहे.
कु. श्रुती ही माउंट कारमेल शाळेची विद्यार्थिनी असून ती संगीताचे धडे तिच्या वडिलांकडून घेते.
या कार्यक्रमाचे प्रसारण दर गुरुवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता झी मराठी या वाहिनीवर होणार आहे.