महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने पी.एल. शिरसाट यांची जयंती साजरी…आकोट शाखेद्वारा आभिवादन कार्यक्रम संपन्न…

0
1205
Google search engine
Google search engine

अकोट तालुक्याच्या वतीने पी.एल.शिरसाट यांची जयंती महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे साजरी करण्यात आली.यामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष शैलेशजी अलोने हे होते,तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठलराव गुजरकर हे होते. सर्व प्रथम पी एल सिरसाट यांच्या प्रतिमेचे पुजन व हारर्पन शैलेशजी अलोने महाराष्ट्र ग्रामीन पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले,

तसेच क्रांत्नि कुमार अलोने यांचा योगा मधे योगदिनी दि.२१ जुन रोजी महाराष्ट्रा मधे प्रथम क्रमांक मिळुन गिनिज बुक मध्ये नोंद झाली, त्या बद्दल त्यांचा अकोट तालुका महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने अकोट ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव गुजरकर यांनी सत्कार करुन व तसेच राजेशजी डागंटे राज्य सचिव यांनी गौरव पत्र व शाल श्रीफळ देवुन सन्मानित केले

तसेच विशाल गवई यांची महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ अकोट यांची सदस्य पदि निवड शैलेश आलोने यांच्या हस्ते करण्यात आली.त्या वेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष शेख अहेमदभाई,प्रकाश आम्ले संघटक निरंजन गावंडे,मनोहरराव गोलाईत, स्वप्निल सरकटे सचिव, काशिनाथ कोंडे, प्रकाश कुकडे, बाळासाहेब मोहीते, गणेश वाकोडे, संजय सपकाळ, विशाल गवई ,देवानंद आग्रे, कमलेश राठी, विकास बोदडे, रोहीत बैस,दयाराम घनबादूर, शेखर तेलगोटे, नरेंन्द कोंडे यांच्या सह आदी पत्रकार उपस्थित होते.व तसेच सूत्र संचालन प्रकाश कुकडे यांनी केले तरआभार प्रदर्शन गणेश वाकडे यांनी केले.