नदी प्रेमींची पावले वळले पूर्णा नदीकडे

0
802

शेगांव:- शेगांव तालुक्याजवळील खिरोडा गांव येथे सोमवारी झालेल्या पावसामुळे अकोला – बुलढाणा जीवनदायिनी अशी ओळख असलेली पूर्णा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. हे विलोभनीय दृष्य पाहण्यासाठी नदीप्रेमींची पावले सध्या नदीकडे वळू लागले आहे. अनेक नदी प्रेमी तसेच निसर्गप्रेमी लोक या ठिकाणी दुचाकी, चारचाकीने जात आहे. तिथे जाऊन सेल्फी व फोटो काढून आनंद लुटत आहे. या पावसाळ्यात पहिल्यांदाच नदी अशा पद्धतीने दुथडी भरून वाहत असल्याने नदीप्रेमी आनंद व्यक्त करीत आहे. बळीराजा सुद्धा सुखावला आहे. नदीच्या विलोभनीय दृष्याचा सेल्फी किंवा फोटो घेताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

परंतु नदीवरून सुरू असलेला नवीन पुल हा केव्हा सुरू होईल? मागील अनेक वर्षंपासून सुरू असलेला तो या पुलाचे काम  लवकरात लवकर सुरू व्हावे जनता याचा प्रतीक्षेत आहे.