शेगांवातील नागरीकांना हवे, संपूर्ण लॉक-डाऊन?

0
448

 

शेगाव:- कोरोना या महामारीचा कहर आपण सर्वांनी अनुभवला, पहिली लाट नंतर दुसऱ्या लाटेला काही दिवसच झाले तर आता आपल्या समोर तिसऱ्या लाटेचे सुद्धा संकट येत आहे. काही जिल्ह्यामध्ये त्याचा प्रभाव जाणवला सुद्धा या परिस्थितीला सय्यमाने सामोरे जाण्याची गरज आहे. शासनाने नियम घालीत सर्व सिथील केले, जनतेने काही दिवस ते नियम पळले परंतु आता नियमांचे पालन केले जात नाही, बेजबाबदार नागरिकांकडून आजही नियमाची पायमल्ली होतांना दिसत आहे.

विशेष म्हणजे, मोठा सुशिक्षित वर्ग नियमांची अंमलबजावणी करत नसल्याचे मोठ्या प्रमाणत दिसून येतो. त्यालासाथ म्हणून की काय? व्यापारी वर्ग पण नियम धाब्यावर बसवत आपली प्रतिष्ठाने कोरोनाला आमंत्रण होईल असे विना मास्कची उघडी केलेली आहे.

आज रस्त्यावर भरमसाठ गर्दी दिसून येते, न सोशल डिस्टन्स, न तोंडाला मास्क असे चित्र  भरलेल्या आठवडी बाजाराचे असते. विशेष करून काही मेडिकल स्टोअर्स वरील मालक व नोकर यांच्या सुद्धा तोंडाला मास्क आढळून आले नाही मग भाजी मार्केट असो की किराणा दुकान किंवा कापड मार्केट. शहरात अनेक दुकाने आहेत की जेथे ना ग्राहकांच्या तोंडाला मास्क असतो, ना दुकानाच्या मालकाच्या, ना मालकाच्या मोठ्या दुकानांत काम करणाऱ्या व्यक्तीच्या. जवळजवळ गावातील सर्व पेट्रोल पंपमध्येही हेच दृष्य आढळून आले.

शासनाने नियम घालून दिल्यावरही गावातील परिसरात अश्या प्रकारचे कोरोनाला आमंत्रण देणारे वातावरण असेल तर यावर कार्यवाही कधी होईल? गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यावर? आपल्या कर्तव्याला सुट्टी दिलेल्या अधिकारी वर्गाची झोप केव्हा उघडेल? झालेल्या परिस्थितीवर लक्ष देऊन नियम मोडणाऱ्यावर कडक कार्यवाही सुरू करावी अशी चर्चा अधिक वजा मागणी जबाबदार नागरिकांमध्ये होतांना दिसत आहे.

नियमांचे काटेकोर पालन, कायद्याचे पालन न केल्यास, शहरातील नागरिक, लहान मोठी दुकानदार तसेच व्यापारी वर्ग कडक असा संपूर्ण संचार बंदीचा लॉकडाऊनची शासनाकडून लागू करण्याच्या आदेशांची वाट पाहताय की काय?
नियम पाळण्यात कुचाळपणा करीत अधिकारी वर्ग बेजबाबदारपणे वागत असेल तर जनतेला नियम मोडण्याची सवलत दिल्यासारखीचं आहे, करतो कोण आणि भोगतो कोण अशी परिस्तिथी निर्माण झालीचे दिसते.