लग्नात कुठलीही फसवेगरी, जबरदस्ती किंवा धर्मांतराचा प्रकार नसतानाही, काहीजण या लग्नाला धार्मिक रंग देऊन त्यावर लव जिहादचा शिक्का मारत आहेत – श्री बच्चू भाऊ कडू

0
3035

 

हिंदू आमचा धर्म आहेच, पण आमचे हिंदुत्व मानवतेला प्राधान्य देणारे आहे. दिव्यांग व्यक्ती आमच्यासाठी दैवत आहे. त्या दैवताची सेवा करणे, त्यांना कुठला त्रास झाला तर तो दूर करण्यासाठी प्रयत्न करणे यालाच आम्ही मानवता मानतो.

नाशिकच्या दिव्यांग भगिनी रसिका आणि आसिफ हे दोघांनी आपल्या कुटुंबियांच्या इच्छेनुसारच कायदेशीर विवाह केला आहे. या लग्नात कुठलीही फसवेगरी, जबरदस्ती किंवा धर्मांतराचा प्रकार नसतानाही, काहीजण या लग्नाला धार्मिक रंग देऊन त्यावर लव जिहादचा शिक्का मारत आहेत. हे चुकीचे आहे. गेली ८-१० वर्षे आपल्या दिव्यांग मुलीच्या लग्नासाठी वडील स्थळ पाहत असताना धर्माचा एकही ठेकेदार त्यांच्या मदतीसाठी धावला नाही. मात्र आता त्यांना धर्म दिसू लागला आहे. एका सर्वसामान्य कुटुंबाला हा त्रास कशासाठी. आपल्या देशात मुख्तार अब्बास नक्वी, सय्यद शहनावाज हुसेन सारखे हिंदुत्ववादी पक्षाच्या नेत्यांनी किंवा शाहरुख-आमिर-सैफ सारख्या अभिनेत्यांनी हिंदू मुलींशी विवाह केले. त्यांना सन्मानाचे स्थान आहे, मात्र रसिका-आसिफ या सर्वसमान्य दाम्पत्याला अशी अपमानास्पद वागणूक कशासाठी ? तुमच्याच घरातील मुलगी किंवा बहीण असती तर तुम्ही काय केले असते ? हा प्रश्न आपण स्वतःला विचारुन पहा. एका दिव्यांग भगिनीच्या आयुष्यात सुखाचे क्षण येत असताना आपण त्याला मीठाचा खडा बनू नका ही विनंती आहे.