सिटी कोतवालीतील मोर्णा नदीच्या पुलाखाली अनोळखी युवकाचे प्रेत आढळले… पोलिसांचे ओळख पटवण्याचे आवाहन

0
642

आकोलाः अकोला मध्ये मुसळधार पावसाने हाहाकार उडाल्याने मोरणा नदी फुगली असून पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अंतर्गत मोरणा नदीचे पुला खाली एक अनोळखी 25 ते 30 वर्ष वयाच्या पुरुषाचे प्रेत दि.२३ जुलै रोजी आढळून आले आहे, मोरणा नदीला आलेल्या पुरात सदर प्रेत वाहत आल्याची श्यक्यता दिसून येत आहे, या अनोळखी प्रेताची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक कायटे ह्या करीत आहेत