अमरावती शहरात पोलिसांनी पकडली जवळपास साडे तीन करोड ची रक्कम

0
1444

6 आरोपी गुजरात निवासी

2 स्कॉर्पिओ मध्ये औरंगाबाद जात होती कॅश

शहरात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात छाप्यात कॅश जप्त

इन्कम टॅक्स व ट्रेझरी विभागाने केली तपासणी सुरू

अमरावती : स्थानिक राजापेठ पोलिसांनी मंगळवारीपहाटे च्या सुमारास फरशी स्टाफ परिसरातून शहराबाहेर जाणाऱ्या दोन चारचाकी वाहनातून मोठी रोकड पकडली. याप्रकरणी तूर्तास तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, तीन मशीनद्वारे रकमेची मोजदाद सुरू आहे. प्रथमदर्शनी ती रक्कम साडे तीन कोटी रुपयांच्या घरात असावी, अशी शक्यता राजापेठ पोलिसांनी व्यक्त केली आहे. पहाटे  ते सकाळी ११ पर्यंत ही मॅराथॉन कारवाई सुरू होती. याप्रकरणी फरशी स्टाप परिसरातील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटची राजापेठ पोलिसांनी सुमारे एक तास झाडाझडती घेतली.