प्रामाणिक, कर्तव्यदक्ष वाहतूक पोलिसांचा JCI अकोला तर्फे भव्य सत्कार

0
539
Google search engine
Google search engine

अकोलाःमागील 2 वर्षा पासून अकोला शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदारांनी आपल्या कर्तव्या सोबतच वेगवेगळ्या मोहिमा व उपक्रम राबविले तसेच रस्त्यावर सापडलेली वेगवेगळी चिजवस्तू आपल्या प्रमाणिकतेचा परिचय देत परत केली, शहर वाहतूक शाखेने करोना काळात केलेले कार्य व राबविलेल्या वेगवेगळ्या मोहिमा ह्याची दखल घेऊन JCI अकोला तर्फे अश्या वाहतूक पोलिसांचा सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला।

ह्या वेळी बोलतांना JCI चे मनोज चांडक व कार्यक्रमाचे अध्यक्ष बेरार एज्युकेशन संस्थेचे मानद सचिव पवन माहेश्वरी ह्यांनी सांगितले की पोलिस अहोरात्र आपले काम करतात परंतु समाजा कडून त्यांचे कौतुक होतांना दिसत नाही, शहर वाहतूक शाखेने अकोला पोलिसांची शान संपूर्ण महाराष्ट्रात वाढविली आहे, म्हणून त्यांचा योग्य सत्कार JCI अकोला करीत आहे,

ह्या वेळी शहर वाहतूक प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन शेळके, उपनिरीक्षक सुरेश वाघ, वाहतूक शाखेचे अंमलदार सुनील मानकर, सुधाकर दाबेराव, अमोल लोखंडे, अनिल अंबिलकर, सुदाम राठोड, निलेश खंडारे, अजहर मोहम्मद, दीपक सोनकर, कैलास सानप, मंगेश गीते, सुमेरसिंग राजपूत, मदन करवते,विजय अदापुरे, सचिन दवंडे, मुस्तफा खान रशीद खान, नारायण गंगाखेडकर, सुधीर जैस्वाल, भास्कर दामोदर, नीता संके, पूजा दांडगे, सुभाष विल्हेकर, ह्यांचा सत्कार करण्यात आला

ह्या वेळी JCI च्या अध्यक्षा कविता मनोज चांडक, पूर्वध्यक्ष शैलेंद्र अग्रवाल, JCI प्रकल्प प्रमुख रेखा खेडकर प्रकल्प प्रमुख रेखा कुलकर्णी ह्या उपस्थित होत्या. ह्या पण उपस्थित होत्याअशोक रहाटे, डॉक्टर स्वप्नील गावंडे, वैशाली रहाटे, विजय केडीया, आरती अग्रवाल, रजत चांडक, तिशा चांडक, खुशी अग्रवाल हे उपस्थित होते।