दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण; एम. श्रीनिवास रेड्डी यांच्याविरुध्दचा FIR रद्द

0
2315
Google search engine
Google search engine

नागपूर / अमरावती :-

नागपूर : मेळघाट हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास रेड्डी त्यांच्याविरुध्द दाखल एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी रद्द केला.

दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली असा आरोप आहे़ चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात अमरावती जिल्ह्यातील धारणी पोलिसांनी रेड्डी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त करणे व इतर विविध गुन्ह्यांतर्गत एफआयआर नोंदवला होता. उच्च न्यायालयाने केवळ रेड्डी यांच्याविरुद्धचा एफआयआर रद्द केला आहे.