मोर्शी येथे विद्यार्थ्यांकरिता एमपीससी यूपीएससी स्टडी अकॅडमी निर्माण होणार !  आमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नामुळे १ कोटी रुपये मंजूर ! 

0
773
Google search engine
Google search engine
मोर्शी येथे विद्यार्थ्यांकरिता एमपीससी यूपीएससी स्टडी अकॅडमी निर्माण होणार !
आमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नामुळे १ कोटी रुपये मंजूर !
मोर्शी तालुका प्रतिनिधी :
         सद्या स्पर्धेचे युग असल्यामुळे मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील तरूण मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेेला बसतात. परंतु पुस्तक महागडी असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना ती खरेदी करणे शक्य नसते. अशा वेळी ही पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध करून दिली तर युवकांचा ओढा ग्रंथालयाकडे वळेल  व त्याचा गरीब मुलांना फायदाही होईल ही संकल्पना आमदार देवेंद्र भुयार यांनी पुढे ठेवून मोर्शी येथे भारत रत्न स्वर्गीय डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यूपीएससी, एमपीएससी स्टडी अकॅडमी निर्माण करण्या करीता १ कोटी रुपये निधी मंजूर करून मोर्शी येथे विद्यार्थ्यांच्या करियर च्या दृष्टीने मोर्शी तालुक्यातील युवक देशांच्या स्पर्धेत टिकावा या करिता भारत रत्न स्वर्गीय डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यूपीएससी, एमपीएससी स्टडी अकॅडमी करिता आमदार देवेंद्र भुयार यांनी वैशिष्टपूर्ण निधीमधून १ कोटी रुपयांची तरतूद करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्टडी अकॅडमी  प्रोत्साहन देणारी ठरणार असल्यामुळे मोर्शी तालुक्यातील युवकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.
समाज जिवनाच्या जळणघडणीत शिक्षक, प्रशासक व लोकप्रतिनिधी हे मानवी समाज परिवर्तनाचे तीन महत्वाचे घटक आहेत. सामाजीक बदल हा स्पर्धतुनच घडत असतो. स्पर्धा परीक्षा ह्या देखील सामाजीक बदलाच्या रूपरेशा आहेत. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातुन उत्कृष्ठ व्यक्तीची निवड करून समाज सेवेचे कार्य घडवुन आणल्या जाते. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने स्पर्धचा विचार केल्यास असे निदर्शनास येते स्पर्धा ही जिवनाचा अविभाज्य घटक आहे. स्पर्धा ही शासकीय व निमशासकीय नोकरीसाठी घेतली जाते. जो या स्पर्धा परीक्षेत यश मिळवितो तोच सरकारी नोकरीसाठी पात्र ठरत असतो. या स्पर्धमध्ये टिकुन राहायचे असेल तर अभ्यासाच्या दृष्टीने खुप प्रयत्न करावा लागतो, खुप पुस्तके वाचावे लागते, ज्ञान संपादन करावे लागते, जनरल नाॅलेजचा व इतरही साहित्याचा अभ्यास करावा लागतो. यासाठी त्याला सर्व सेेवा सुविधायुक्त ग्रंथालयात बसुन पुस्तकांचे, ग्रंथाचे व जनरल साहित्याचे सखोल अध्ययन करावे लागते. वाचनाचा विकास करावा लागतो. त्यासाठी मोर्शी येथे भारत रत्न स्वर्गीय डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यूपीएससी, एमपीएससी स्टडी अकॅडमी करीता १ कोटी रुपये मंजूर करून सर्व सेवा सुविधायुक्त डिजिटल स्टडी अकॅडमी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यास करून ते तंत्र आत्मसात करण्याची संधी प्राप्त होणार असून ख-या अर्थाने त्याचा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने वाचनाचा विकास होणार असल्याचे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी केले.