*ह.भ.प. डॉ. हरिदास महाराज आखरे यांचे फक्त मराठी वाहिनीवर कीर्तन*

0
735
Google search engine
Google search engine

*ह.भ.प. डॉ. हरिदास महाराज आखरे यांचे फक्त मराठी वाहिनीवर कीर्तन*

शेगाव :-  येथील संत साहित्याचे अभ्यासक तथा श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालय दर्यापूर येथील सहायक प्राध्यापक डॉ. हरिदास आखरे यांचे दिनांक २३ ऑगस्ट सोमवारला सकाळी ७.०० वाजता फक्त मराठी या सुप्रसिद्ध मराठी चॅनल वर हरी किर्तन संपन्न होत आहे.
श्रावण मास निमित्त या विशेष कीर्तनाचे आयोजन केलेले आहे. फक्त मराठी वाहिनीचे समन्वयक विक्रमजी आप्पा ताजणे यांनी ही सेवा त्यांना उपलब्ध करून दिली आहे. प्रस्तुत कीर्तनात पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचे महात्म्य वर्णन केले आहे. संत म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशिक्षक असून त्यांनी जगाला दया, क्षमा शांती व प्रयत्न वादाचा संदेश दिला आहे.
*संत तोची जाणा जगी l दया क्षमा ज्याचे अंगी ll*
संतांनी सांगितला अध्यात्म विचार, संतांचे या जगावर असणारे अनंत उपकार आणि संतांनी सांगितलेली जीवन जगण्यातील सकारात्मकता त्यांनी प्रस्तुत कीर्तनातून मांडली आहे. सर्वांनी या भक्तिमार्गा मध्ये येऊन नाम साधनेने व आपल्या सत्कर्म आचरणाने जीवनातील दुःखाची निवृत्ती करून परम सुखाची प्राप्ती करावी. आपल्या जीवनाचे योग्य कर्माने कल्याण करावे. असा संदेश या कीर्तनातून दिलेला आहे. देवाचिये द्वारी l कीर्तनाची वारी या सदरात *काय सांगू आता संतांचे उपकार l मज निरंतर जागविती ll*
या संत तुकारामांच्या संत महिमा वर्णन करणाऱ्या अभंगावर आपले चिंतन त्यांनी मांडले आहे. त्यांना गायनासाठी सर्वश्री ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज तायडे शेगांव. संतोष महाराज वसतकार भोनगाव, रमेश म. पुंडे मनार्डी, तर मृदंगावर ज्ञानेश्वर म.राजपूत जामनेर यांनी साथ केली आहे. टाळकरी म्हणून शेगांव येथील श्री.सुधाकर पाटील, श्री.बाबुराव पुंडे, श्री.गजानन गायकवाड, सुरेश मोरखडे, अनिल गायकवाड या सर्वांनी साथ संगत केली आहे. तरी सर्वांनी या वारी विशेष कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा.