मोर्शी वरुड च्या ग्रामीण रस्त्यांच्या कामासाठी १ कोटी ४८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर ! 

0
998
Google search engine
Google search engine
मोर्शी वरुड च्या ग्रामीण रस्त्यांच्या कामासाठी १ कोटी ४८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर !
अतिरिक्त १ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर !
आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांना यश
मोर्शी तालुका प्रतिनिधी :
मोर्शी विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील महत्वाच्या रस्त्यांचे नूतनीकरण व दुरुस्ती करण्यासाठी १९-२०,२०-२१ वर्षा साठी लेखाशीर्ष ३०५४ अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी १ कोटी ४८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून शासन निर्माण निर्गमित झाल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली .
मोर्शी विधानसभा मतदार संघातील विविध ग्रामीण भागातील मार्गावर खड्डे पडल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे या गावातील नागरिक, शेतकरी, व्यावसायिक तसेच शालेय विद्यार्थ्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत होते. या रस्त्यांच्या व पुलांच्या दुरुस्तीची कामे व्हावीत अशी नागरिकांची मागणी होती. या मागणीची दखल घेत देवेंद्र भुयार यांनी  रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु केला होता. त्या पाठपुराव्याला यश मिळून या रस्त्यांच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी तब्बल १ कोटी ४८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
          मोर्शी वरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते व पुलांची दुरुस्तीचा प्रस्ताव ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आमदार देवेंद्र भुयार यांनी सादर करून गांभीर्याने चर्चा करून ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी वरुड मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते व पुलांच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाची दखल घेऊन ३०५४ अंतर्गत रस्ते व पूल परीक्षण कार्यक्रम अंतर्गत गट ब व गट क मधील १ कोटी ४८ लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे.  आमदार देवेंद्र भुयार यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे रस्ते व पुलांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करून वारंवार भेटी घेऊन मोर्शी वरुड तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था गांभीर्याने लक्षात आणून दिली. याची तातडीने दखल घेऊन रस्त्यांच्या कामासाठी १ कोटी ४८ लक्ष  रुपयांची मंजुरी दिली असून  वरुड मोर्शी तालुक्यातील रामा ४७ हिवरखेड यावली रस्ता २१लक्ष रुपये, उराड ते लोहदरा रामा ४७ ला जोडणारा रस्ता २१ लक्ष रुपये, नटाळा पोचमार्ग हिवरखेड लोणी प्रजिमाला जोडणारा रस्ता १५ लक्ष रुपये, उदापुर मेंढी ते नवीन देउतवाडा ते देउतवाडा रस्ता २५ लक्ष रुपये, मेंढी ते खानापूर रस्ता १५ लक्ष रुपये, काटी ते गडेगाव रस्ता २० लक्ष रुपये, मालखेड जोड रस्ता १५ लक्ष रुपये, एकदरा पोहच मार्ग रामा २९३ ला जोडणारा रस्ता १० लक्ष रुपये, लोणी ते पेठ मंगरुळी रस्ता ३ लक्ष रुपये, बेलोरा अलोडा मार्ग ३ लक्ष रुपये. या सर्व विकास कामांसाठी १ कोटी ४८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या  विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार व्यक्त केले.