डोंगर यावली येथे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांचा गौरव !  सहाय्यक अभियंता रोहित म्हस्के, वरिष्ठ तंत्रज्ञ मंगेश गावंडे  यांचे कार्य कौतुकास्पद ! 

0
530
Google search engine
Google search engine
डोंगर यावली येथे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांचा गौरव !
सहाय्यक अभियंता रोहित म्हस्के, वरिष्ठ तंत्रज्ञ मंगेश गावंडे  यांचे कार्य कौतुकास्पद !
मोर्शी तालुका प्रतिनिधी:
 ‘गेल्या ६ वर्षांपासून डोंगर यावली घोडदेव परिसरामध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करणारा वरिष्ठ तांत्रिक मंगेश गावंडे यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पुरवठा सुरळीत राहावा यासाठी दिवस रात्र काशाचीही पर्वा न करता धडपड करणारा प्रामाणिक कर्मचारी म्हणून ओळख निर्माण केली आहे. डोंगर यावली घोडदेव परिसरामध्ये सतत ६ वर्ष दिवस रात्र सेवा देणाऱ्या मंगेश गावंडे यांची बदली मोर्शी येथे झाल्यामुळे शेतकऱ्यांतर्फे वरिष्ठ तंत्रज्ञ मंगेश गावंडे व  हिवरखेड मंडळातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमी पुढाकार घेणारे सहाय्यक अभियंता रोहित म्हस्के यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
      कोरोनाचा काळ व  चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये महावितरणचे अभियंते व कर्मचारी हे सुरळीत वीजपुरवठा तसेच ग्राहकसेवेसाठी अत्यंत खडतर व आव्हानात्मक परिस्थितीत कर्तव्य बजावीत आहेत व त्यांचे कार्य अभिमानास्पद आहे’, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सन्मान करतांना काढले.
ज्या पद्धतीने शरिरात रक्त सगळीकडे वाहून नेण्याचे काम रक्तवाहिन्या करतात, त्याच पद्धतीने गावागावातून विद्युत प्रवाह सुरळीत ठेवण्याचे काम महावितरणचे कर्मचारी जीवाची बाजी लावून करतात. त्यांच्या या कामाची दखल घेऊन डोंगर यावली घोडदेव येथील शेतकाऱ्यांतर्फे  अभियंता रोहित म्हस्के, वरिष्ठ तंत्रज्ञ मंगेश गावंडे यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला सरपंच भाग्यश्री केचे, उपसरपंच कांचन कुकडे, मनीष गुडधे, रुपेश वाळके, धनंजय अमदरे, घनश्याम दाणे, सहाय्यक अभियंता रोहित म्हस्के, वरिष्ठ तंत्रज्ञ मंगेश गावंडे,  वर्मा साहेब, शरद काटोलकर , बंडू समुद्रे, माणिकराव गायकवाड, सर्जयभाऊ पांडव, विजय हागे,  राहुल गावंडे , बाल्याभाऊ पांढरे , गौरव खाडगडे , प्रकाश युवनातें , गोकुळअहिरे , स्वप्नील ठोके , स्वप्नील साबळे , विजय चढोकर , राजाभाऊ शेंडे सर्व शेतकरी आणि गावकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
डोंगर यावली घोडदेव परीसरातील शेतकऱ्यांनी केलेला हा सन्मान आम्हाला काम करण्याची नवी प्रेरणा देणारा असून अशाप्रकारे पहिल्यांदाच आमच्या कामाची दखल घेतली गेली —  मंगेश गावंडे वरिष्ठ तंत्रज्ञ .
समाजामध्ये आपल्या जीवाची बाजी लावून अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे कार्य महावितरणच्या लाईनमनसह सर्व कर्मचारी करतात. कधी ही सेवा देणारा कर्मचारी लोकांच्या रोषाला बळी पडत असतो. मात्र, तरीही हे सर्व कर्मचारी मनापासून काम करतात. त्यामुळे दुर्लक्षित अशा महावितरण कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेणे आणि सन्मान करणे हा आमचा उद्देश आहे — रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष .
महावितरण कर्मचारी मंगेश गावंडे कोणत्याही अडचणी न सांगता आपल्या भागातील अंधार दूर कसा होईल, यासाठी या कर्मचाऱ्यांची धडपड सुरू असते. अशाच त्यांच्या कामातून आम्हालाही काम करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे हा सन्मान करण्यात आला — मनीष गुडधे शेतकरी.